Restaurants Service Charge Sakal
Personal Finance

Restaurants Service Charge: रेस्टॉरंट्सच बिल नेहमीच जास्त... न विचारता जोडला जातोय सेवा शुल्क!

Restaurants Service Charge: ग्राहक म्हणून तुम्हाला कोणते अधिकार आहेत?

राहुल शेळके

Restaurants Service Charge: बहुतेक लोकांना घरचे जेणन आवडते, कारण ते अतिशय स्वच्छ, ताजे आणि बाहेरच्या तुलनेत कमी मसालेदार असते. पण अनेक प्रसंग असेही येतात जेव्हा लोक हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात.

हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवण ऑर्डर करता, जेवण झाल्यानंतर तुम्ही बिल भरता. पण तुम्ही कधी तुमचे बिल काळजीपूर्वक पाहिले आहे का? आणि जर तुम्ही पाहिलं असेल, तर तुमच्या लक्षात आलं आहे का की तुमच्याकडून जेवणाच्या बिलात सेवा शुल्क आकारले जाते?

लोकल सर्कल सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, गेल्या तीन महिन्यांत 43 टक्के लोकांच्या बिलांमध्ये सेवा शुल्क न विचारता जोडले होते आणि त्याचे पैसे लोकांनी कोणतीही विचारपूस न करता दिले होते. याउलट, केवळ 9 टक्के लोकांनी त्यांचे अधिकार रेस्टॉरंट मालकांना सांगितले आणि त्यानंतर सेवा शुल्क दिले नाही.

11,066 लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. या लोकांना "गेल्‍या तीन महिन्‍यांमध्‍ये तुम्ही वातानुकूलित रेस्टॉरंटला भेट दिली असता सेवा शुल्काबाबत तुमचा अनुभव काय होता?" असा प्रश्न विचारला होता.

बहुसंख्य लोकांनी (43 टक्के) प्रतिसाद दिला की, रेस्टॉरंटने शुल्क आकारले आणि आम्ही पैसे दिले, तर केवळ 9 टक्के लोकांनी असे सांगितले की त्यांनी सेवा शुल्क देण्यावर वाद घातला आणि पैसे परत मिळवले.

विशेष म्हणजे सर्व वातानुकूलित रेस्टॉरंट्स ग्राहकांना न विचारता सेवा शुल्क आकारत नाहीत, असे सर्वेक्षणातील 30 टक्के लोकांनी नोंदवले आहे. आणखी 18 टक्के लोकांनी नमूद केले की त्यांना या समस्येबद्दल माहिती नव्हती कारण त्यांनी एकतर लक्ष दिले नाही किंवा इतर कोणीतरी त्यांच्या वतीने बिल दिले.

सर्वेक्षण अहवालात सप्टेंबर 2022 आणि जुलै 2023 मध्ये केलेल्या सर्वेक्षणांमधील तुलनात्मक विश्लेषणाचा समावेश आहे, जे दर्शविते की रेस्टॉरंट उद्योग पुन्हा जोरात सुरू असूनही, ग्राहकांवर अजूनही सेवा शुल्काची सक्ती केली जाते.

12 एप्रिल 2023 रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने एक आदेश जारी केला, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये "सेवा शुल्क" शब्दाच्या जागी "कर्मचारी कल्याण शुल्क" सारख्या शब्दाच्या पर्यायाचा विचार करावा.

उच्च न्यायालयाने 4 जुलै 2022 रोजी सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी (CCPA) ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवरही स्थगिती आणली होती. हॉटेल आणि रेस्टॉरंटना सक्तीने बिलांवर सेवा शुल्क आकारण्यास बंदी घातली होती.

न्यायालयाने स्पष्ट केले होते की, सेवा शुल्क न्यायालयाने मंजूर केले आहे, असा विश्वास ठेवून ग्राहकांची दिशाभूल करू नये.

सेवा शुल्क म्हणचे काय?

जेवणानंतर तुम्हाला जे बिल दिले जाते, त्यामध्ये तुमच्या नावावर 5-10% शुल्क आकारले जाते, ज्यामुळे CCPA ने रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या विरोधात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ग्राहक म्हणून तुम्हाला कोणते अधिकार आहेत?

  • सर्वप्रथम, तुम्ही रेस्टॉरंट किंवा हॉटेलला बिलातून सेवा शुल्क काढून टाकण्याची विनंती करू शकता.

  • तुमच्या विनंतीनंतरही हॉटेल किंवा रेस्टॉरंटने सेवा शुल्क माफ करण्यास नकार दिल्यास, तुम्ही रेस्टॉरंटच्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) वर 1915 वर कॉल करून किंवा NCH मोबाइल अॅपवर तक्रार नोंदवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

India South Africa Relation: दक्षिण आफ्रिका : भारताचा गांधीकालापासून मित्र

Nagpur News: समृद्धी सर्कल मार्गावरील सिमेंट रस्त्याला तडे

'मला जेलमध्ये टाकाल का...' पापाराझींवर सलमान खान भडकला, म्हणाला...'असले मी १०० जाळेन'

SCROLL FOR NEXT