Air India Amravati Sakal
Personal Finance

Tata Group: टाटा अमरावतीमध्ये उभारणार दक्षिण आशियातील सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार

Tata Group: टाटा समूह उभारत असलेली उड्डाण प्रशिक्षण संस्था (FTO) दक्षिण आशियातील सर्वात मोठी असणार आहे, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ते तयार होईल.

राहुल शेळके

Air India Amravati: टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. दरवर्षी 180 व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षित करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

टाटा समूह उभारत असलेली उड्डाण प्रशिक्षण संस्था (FTO) दक्षिण आशियातील सर्वात मोठी असणार आहे, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही संस्था सुरु होईल अशी शक्यता आहे.

एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, ही सुविधा देशात स्थापन केलेली पहिली सुविधा असेल. यात प्रशिक्षणासाठी 31 सिंगल इंजिनची विमाने आणि तीन ट्विन इंजिनची विमाने असतील. एअर इंडियाने सांगितले की त्यांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) कडून 30 वर्षांसाठी सुविधा उभारण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन, व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणाले, अमरावतीमधील FTO चा उद्देश भारतीय विमान वाहतूक अधिक स्वावलंबी बनवणे आणि भारतातील तरुणांच्या वैमानिक म्हणून उड्डाण करण्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे आहे.

तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. ते म्हणाले, या FTO मध्ये प्रशिक्षित तरुण पायलट एअर इंडियाच्या जागतिक दर्जाची एअरलाइन बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला चालना देतील.

MADC च्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे म्हणाल्या, MADC आणि Air India यांच्यातील सहयोगी उपक्रमामुळे विमान वाहतूक क्षेत्रात केवळ 3,000 हून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT