Akshay Trutiya gold google
Personal Finance

Akshay Trutiya : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

आजकाल बाजारात खऱ्या सोन्याच्या नावाखाली बनावट सोने लोकांना विकले जात आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

नमिता धुरी

मुंबई : भारतात सोन्याचा वापर विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. बऱ्याचदा सोने दागिने म्हणून वापरले जाते. आपल्या देशातील बहुतेक लोक लग्नासारख्या शुभ प्रसंगी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.

त्याच वेळी, इतर अनेक प्रसंगी, सजवण्यासाठी आणि सुशोभित करण्यासाठी सोन्याचा भरपूर वापर केला जातो. तुम्हीही अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. (Akshay Trutiya tips for gold shopping how to know that my gold is pure or not ) हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आजकाल बाजारात खऱ्या सोन्याच्या नावाखाली बनावट सोने लोकांना विकले जात आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. आज आपण अशा पद्धतींबद्दल माहिती घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही खरे आणि खोटे सोने ओळखू शकता.

खरे सोने ओळखण्यासाठी, तुम्हाला हॉलमार्क पाहणे आवश्यक आहे. हॉलमार्कद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. नवीन निर्णयानंतर १ एप्रिल २०२३ पासून फक्त ६ अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध आहे. त्याशिवाय सोने आणि दागिने विकले जात नाहीत.

ग्राहक हिताच्या दृष्टीने ग्राहक व्यवहार विभागाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. ४ अंक असलेले हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. 

याशिवाय तुम्ही चुंबकाद्वारे खऱ्या आणि बनावट सोन्यामधील फरक देखील शोधू शकता. सोन्याच्या आत चुंबकीय गुणधर्म नसतात. जर तुम्ही सोन्याजवळ चुंबक आणले आणि ते त्याच्याकडे आकर्षित झाले तर समजा की सोने खोटे आहे.

आपण पाण्याद्वारे देखील त्याची गुणवत्ता शोधू शकता. त्यासाठी पाण्यात सोने टाकावे लागेल. जर तुमचे सोने पाण्यात टाकल्यानंतर ते वर तरंगत असेल तर याचा अर्थ ते खोटे आहे.

अॅसिडच्या माध्यमातूनही खरे सोने ओळखता येते. यासाठी तुम्हाला नायट्रिक अॅसिड वापरावे लागेल. हे अॅसिड तुम्हाला सोन्याच्या काही भागावर ओतावे लागेल. अॅसिड टाकल्यानंतर काही परिणाम दिसला तर समजावे की सोने खोटे आहे.

व्हिनेगरच्या मदतीने सोन्याचा दर्जा देखील ओळखता येतो. यासाठी तुम्हाला सोन्याच्या वर व्हिनेगरचे काही थेंब टाकावे लागतील. जर व्हिनेगरचा रंग बदलला तर याचा अर्थ सोने बनावट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT