Gold Silver Price Updates
Gold Silver Price Updates esakal
Personal Finance

Akshaya Tritiya 2023: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोफत मिळतेय सोन्याचे नाणे; जाणून घ्या

राहुल शेळके

Akshaya Tritiya 2023 Gold Offers: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. यावर्षी हा सण 22 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे.

त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा दिवस जवळ येताच सोने खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. यासोबतच लोक या दिवशी चांदी आणि हिऱ्यांची खूप खरेदी करतात. मात्र सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झाला आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, अनेक मोठ्या ज्वेलर्सनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने खास ऑफर आणल्या आहेत.

50% पर्यंत सूट मिळत आहे :

अक्षय्य तृतीयेच्या विशेष प्रसंगी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, अनेक ज्वेलरी ब्रँड्सनी त्यांच्या मेकिंग चार्जेसवर 50% पर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत सोने आणि हिऱ्याच्या दोन्ही दागिन्यांवर उपलब्ध आहे.

तनिष्कवर भारी सवलत

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने, टाटाचा ज्वेलरी ब्रँड तनिष्क त्याच्या मेकिंग चार्जेसवर मोठी सवलत ऑफर देत आहे. कंपनीचे सोन्याचे दागिने आणि डायमंड ज्वेलरी खरेदीवर ग्राहकांना मेकिंग चार्जेसमध्ये 25% पर्यंत सूट मिळत आहे.

ही ऑफर 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023 पर्यंत वैध आहे. ग्राहकांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या चार्जेसवर 10%, 3 ते 7 लाख रुपयांवर 15%, 7 ते 15 लाख रुपयांवर 20% आणि 15 लाख रुपयांच्या वर 25% सूट मिळत आहे.

मलबार गोल्ड आणि डायमंडवर प्रचंड सूट

मलबार गोल्ड अँड डायमंड्सने अक्षय तृतीयाच्या निमित्ताने ऑफर्स ठेवली आहे. अक्षय्य तृतीयेला मोफत सोन्याचे नाणे ऑफर आणली आहे. 30,000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने खरेदी केल्यास, ग्राहकांना 100 मिलीग्राम सोन्याचे नाणे मिळेल. ही ऑफर फक्त 30 एप्रिल 2023 पर्यंत वैध आहे.

सेनको गोल्ड  कडून उत्तम ऑफर

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर, सेन्को गोल्ड आणि डायमंड्स ब्रँडद्वारे ग्राहकांना सोन्याचे आणि हिऱ्याच्या दागिन्यांच्या शुल्कावर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.

त्याच वेळी, ब्रँड ग्राहकांना हिऱ्यांच्या दागिन्यांवर 12 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. दुसरीकडे, तुम्ही जुन्या दागिन्यांऐवजी नवीन दागिने खरेदी केल्यास त्यावर 0% वजावट शुल्क आकारले जाईल.

पीसी चंद्र ज्वेलर्स प्रचंड सवलत देत आहे

पीसी चंद्र ज्वेलर्स अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर, ग्राहक सर्व प्रकारच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जवर 15% पर्यंत सूट देत आहे. डायमंड आणि स्टोनच्या खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. ही ऑफर 15 एप्रिल 2023 ते 23 एप्रिल 2023 दरम्यान वैध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Latest Marathi News Live Update : आज नाशिकमध्ये नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; अमेरिकन बाजारात वाढ, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT