Akshaya Tritiya Gold Offers 2024 get 25 percent odd on Gold and diamond jewellery  Sakal
Personal Finance

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Akshaya Tritiya 2024: हिंदू धर्मात अक्षय तृतीयेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यंदा हा सण 10 मे म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे. अक्षय तृतीयेच्या आधी सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत असते

राहुल शेळके

Akshaya Tritiya 2024: हिंदू धर्मात अक्षय तृतीयेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यंदा हा सण 10 मे म्हणजेच आज शुक्रवारी साजरा होत आहे. अक्षय तृतीयेच्या आधी सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत असते, पण देशातील टॉप ज्वेलरी ब्रँड्सनी या खास प्रसंगी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना मेकिंग चार्जेसवर 25 टक्के सूट मिळत आहे.

तनिष्क 20 टक्के सूट देत आहे

टाटाचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्क या अक्षय तृतीयेला आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आला आहे. कंपनी ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 20 टक्के भरघोस सूट देत आहे. ही ऑफर 2 ते 12 मे पर्यंत असणार आहे.

मलबार गोल्ड मोठ्या सूट देत आहे

प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड मलबार गोल्ड आपल्या ग्राहकांना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25 टक्के सूट देत आहे. कंपनीची ही ऑफर 27 एप्रिल ते 12 मे 2024 पर्यंत असणार आहे. यासोबतच, ब्रँड हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25 टक्के भरघोस सूटही देत ​​आहे. तर SBI क्रेडिट कार्ड धारकांना 25,000 रुपयांच्या किमान खरेदीवर 5 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळत आहे. ही ऑफर 1 मे ते 10 मे पर्यंत असणार आहे.

फॅशनेबल ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड मेलोराने हिरे आणि रत्नांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25 टक्के सूट जाहीर केली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवसापर्यंत तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता.

जॉयलुक्का विशेष सवलत देत आहे

ज्वेलरी ब्रँड Joyalukkasअक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना विशेष सवलत देत. कंपनीने खास ऑफर लाँच केली आहे. 50,000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांना 1,000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. ही ऑफर 3 मे ते 13 मे पर्यंत असणार आहे.

त्याचवेळी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना 500 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर, तुम्हाला 2,000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. ही ऑफर 26 एप्रिल ते 12 मे 2024 पर्यंत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT