Amartya Sen On Manmohan Singh Sakal
Personal Finance

Manmohan Singh: विद्यार्थी असताना मनमोहन सिंग हे... नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञाने सांगितली कॉलेजची आठवण

Amartya Sen On Manmohan Singh: भारताचे तेरावे पंतप्रधान आणि महान अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी 26 डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देश आणि जगातील तमाम दिग्गज व्यक्ती त्यांना आदरांजली वाहत आहेत.

राहुल शेळके

Amartya Sen On Manmohan Singh: भारताचे तेरावे पंतप्रधान आणि महान अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी 26 डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देश आणि जगातील तमाम दिग्गज व्यक्ती त्यांना आदरांजली वाहत आहेत.

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी त्यांची जुनी आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते की, मी दिल्लीत असताना मला कोणी विचारले की, माझ्या विद्यार्थ्यी सहकाऱ्यांपैकी कोण पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे, तर मी मनमोहन सिंग यांचे नाव सांगितले असते. कारण त्यांना राजकारणात जास्त रस नव्हता. पण नंतर ते पंतप्रधान झाले आणि मला वाटते की त्यांनी चांगले काम केले.

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी राहुल गांधींबद्दलही सांगितले. ते म्हणाले, राहुल गांधी आता खूप परिपक्व झाले आहेत. मी त्यांना 'ट्रिनिटी कॉलेज'चा विद्यार्थी असल्यापासून ओळखतो. ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो आणि नंतर ‘मास्टर’ झालो. त्यावेळी राहुल गांधी मला भेटायला आले होते आणि त्यावेळी त्यांना काय करायचे आहे हे स्पष्ट नव्हते. त्यावेळी त्यांना राजकारण आवडत नव्हते.

राजकारणात सुरुवातीच्या काळात त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी गेल्या काही दिवसांत त्यांच्यात बरेच बदल झाले आहेत. त्यांची अलीकडील कामगिरी चांगली आहे.

भारत जोडो यात्रेवर अमर्त्य सेन काय म्हणाले?

राहुलच्या 'भारत जोडो यात्रा' उपक्रमाचा उल्लेख करताना सेन म्हणाले, 'राहुल यांनी चांगले काम केले आहे. मला वाटते की हा दौरा भारत आणि त्यांच्यासाठी चांगला होता. मला वाटते की त्यांनी स्वतःची अभिव्यक्ती करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.

विशेषत: जेव्हा ते ट्रिनिटीमध्ये आले तेव्हा त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे आपले विचार व्यक्त केले. राहुल गांधी पंतप्रधान होण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, अशी भविष्यवाणी करणे खूप कठीण आहे.

संसदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे नेतृत्व काँग्रेससाठी वरदान ठरेल, असे ते म्हणाले. ते विरोधी पक्षाचे नेतृत्व कसे करतात हे पाहणे रंजक ठरेल, कारण अलीकडच्या काळात देशात विषमता आणि जातीयवाद वाढला आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे ही त्यांची पहिली भूमिका आहे. ते ती उत्तम प्रकारे हाताळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT