Apple laid off over 600 employees  Sakal
Personal Finance

Apple Layoffs: ॲपलने 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

Apple Layoffs: आयफोन निर्माता कंपनी ॲपलने 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहेत. Appleने कार आणि मायक्रो एलईडी ऍपल वॉच प्रकल्प बंद केल्यानंतर 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

राहुल शेळके

Apple Layoffs: आयफोन निर्माता कंपनी ॲपलने 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहेत. Appleने कार आणि मायक्रो एलईडी ऍपल वॉच प्रकल्प बंद केल्यानंतर 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

ब्लूमबर्गच्या मते, ॲपलने कॅलिफोर्नियामधील 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रकल्पांमधील महत्त्वपूर्ण बदलांचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले आहे.

Apple ने या वर्षी फेब्रुवारीमध्ये कार आणि स्मार्ट वॉच डिस्प्ले डेव्हलपमेंटवर आधारित दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद केले होते. यानंतर कर्मचारी कपातीची भीती निर्माण झाली होती. (Apple laid off over 600 employees after shutting down its car, microLED Apple Watch projects)

कार विभागातील 371 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले

कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील कारशी संबंधित कार्यालयातून 371 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक सॅटेलाइट कार्यालयातील इतर अनेक कर्मचारी प्रभावित झाले आहेत. अद्याप ऍपलने नोकरी कपातीबद्दल अधिक तपशील उघड केलेले नाहीत.

ॲपलच्या कार प्रकल्पाची जगभरात चर्चा झाली होती. सध्या अनेक मोबाईल आणि गॅझेट कंपन्या ईव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहेत. Xiaomi सारख्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्या देखील EV बाजारात उतरत आहेत. ॲपलने काही काळापूर्वी अशाच एका प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी कार प्रकल्पातून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे.

शेअरची किमत घसरली

ॲपलमधील कर्मचारी कपात हे तंत्रज्ञान उद्योगासाठी चांगले लक्षण मानले जात नाही. ॲपल कंपनीची गणना केवळ टेक उद्योगातच नाही तर एकूणच जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये केली जाते.

ॲपलचे शेअर्स गुरुवारी अमेरिकन बाजारात 0.49 टक्क्यांनी घसरून 168.82 डॉलरवर आले. कंपनीचे मार्केट कॅप 2.61 ट्रिलियन डॉलर होते. या मूल्यांकनासह, Apple फक्त Microsoft च्या मागे आहे आणि जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

आर्थिक आघाडीवर सततच्या आव्हानांमुळे, आयटी क्षेत्रातील जवळजवळ सर्व कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च महिन्यात 5 मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT