Aptech MD CEO  Sakal
Personal Finance

Anil Pant Passes Away: अ‍ॅपटेक कंपनीचे एमडी अनिल पंत यांचे निधन

Anil Pant Passes Away: कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहीती दिली आहे.

राहुल शेळके

Anil Pant Passes Away: Aptech चे MD आणि CEO डॉ. अनिल पंत यांचे 15 ऑगस्ट रोजी निधन झाले. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहीती दिली आहे. Aptech ने एका निवेदनात म्हटले आहे, "कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल पंत यांचे मंगळवारी (15 ऑगस्ट, 2023) दुःखद निधनाबद्दल कंपनीला खेद होत आहे."

फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, Aptech "डॉ. पंत यांचे योगदान आणि कंपनीला त्यांची खूप उणीव भासेल. कंपनीचे सर्व संचालक आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त करत आहेत," असे निवेदनात म्हटले आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव पंत जूनमध्ये रजेवर गेले होते

पंत यांच्या निधनाची माहिती काही महिन्यांनंतर आली आहे. त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतली होती. कंपनीने त्यावेळी शेअर बाजाराला कळवले होते की, यावर्षी 19 जून रोजी पंत यांनी प्रकृती खालावल्याने अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतली होती.

कंपनीची 19 जून रोजी तातडीची बैठक झाली

या फाइलिंगनुसार, 19 जून रोजी कंपनीची तातडीची बैठक झाली. कंपनीने कामकाजात सातत्य राखण्यासाठी मंडळाचे निवडक सदस्य आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांचा समावेश असलेली अंतरिम समिती स्थापन केली. पुढे Aptech चे संचालक मंडळ अंतरिम CEO निवडण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत.

अनिल पंत 2016 पासून अॅपटेकचे एमडी आणि सीईओ होते. अॅपटेकचा पदभार स्वीकारण्यापूर्वी पंत हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि Sify Technologies सारख्या कंपन्यांशी संबंधित होते.

त्यांनी ब्लो पास्ट, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, विप्रो आणि टॅली सारख्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले होते. पंत यांनी बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी (बीई) आणि मलेशियाच्या लिंकन विद्यापीठतून आयटीमध्ये पीएचडी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT