Atal Pension Yojana Esakal
Personal Finance

Pension Yojana: ज्येष्ठ नागरिकांसाठी दमदार पेन्शन योजना, दरमहा मिळतील 5 हजार रुपये, कसे ते जाणून घ्या

सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात.

राहुल शेळके

Atal Pension Yojana: सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना लोकांसाठी चालवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल (Atal Pension Yojana) सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला तुमच्यासाठी चांगल्या पेन्शनची व्यवस्था करू शकता.

जर तुम्ही या योजनेत दरमहा 210 रुपये गुंतवले तर तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळेल. जितक्या लवकर तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू कराल तेवढा तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही या योजनेत 210 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करू शकता. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीनुसार दरमहा पेन्शन मिळेल.

अटल पेन्शन योजनेला (APY) 9 मे रोजी 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 मध्ये ही योजना सुरू केली. अटल पेन्शन योजना (APY) मध्ये, वयाच्या 60 व्या वर्षी, प्रत्येक महिन्याला 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळेल.

18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. योजनेत सामील होण्यासाठी आधार, मोबाइल क्रमांक आणि बचत बँक खाते असणे आवश्यक आहे.

निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे त्यानुसार तुमची रक्कम दरमहा कापली जाईल. योजनेत दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी 42 ते 210 रुपये दरमहा भरावे लागतील.

अशा प्रकारे तुम्हाला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल:

जर 18 वर्षांच्या व्यक्तीने दरमहा 42 रुपये जमा केले तर 60 वर्षांनंतर त्याला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल. 84 रुपये जमा केल्यावर तुम्हाला 2,000 रुपये पेन्शन मिळेल. आणि 210 रुपये जमा केल्यावर दरमहा 5,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.

दुसरीकडे, 40 वर्षांच्या व्यक्तीला 5,000 रुपयांच्या पेन्शनसाठी 1,454 रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे 19 वर्षे ते 39 वर्षे वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT