Auction of spectrum sakal
Personal Finance

Auction of Spectrum : दूरसंचार ‘स्पेक्ट्रम’चा लिलाव २५ जूनपर्यंत पुढे

दूरसंचार विभागाकडून ९६,३१७ कोटी रुपयांच्या ध्वनिलहरी पट्ट्याचा (स्पेक्ट्रम) लिलाव २५ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दूरसंचार विभागाकडून ९६,३१७ कोटी रुपयांच्या ध्वनिलहरी पट्ट्याचा (स्पेक्ट्रम) लिलाव २५ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. आधी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे, बुधवारी (ता.६ ) हा लिलाव होणार होता, असे दूरसंचार विभागाने जाहीर केले आहे.

या माध्यमातून ८०० मेगाहर्टझ, ९०० मेगाहर्टझ, १,८०० मेगाहर्टझ, २,१०० मेगाहर्टझ, २,३०० मेगाहर्टझ, २,५०० मेगाहर्टझ आणि ३,३०० मेगाहर्टझ क्षमतेच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार असून, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया हे या लिलावातील प्रमुख स्पर्धक आहेत.

‘जिओ’ने या लिलावात सहभागी होण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची अग्रिम ठेव जमा केली आहे. एअरटेलने १,०५० कोटी रुपये, तर व्होडाफोन-आयडियाने ३०० कोटी रुपये जमा केले आहेत. याआधी जुलै २०२२मधील पहिल्या ‘फाइव्ह- जी’ लिलावात, सरकारला २१,८०० कोटी रुपयांची अग्रिम रक्कम आणि १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: सर्वसामान्यांना स्वप्नातलं घरं मिळणार, सिडको १९ हजार घरे बांधणार; पण कुठे आणि कधी?

AI for Breakup Recovery : अपयशी प्रेमीयुगुलांना सावरतोय 'AI'; 'मूव्ह ऑन'साठी दुखावलेल्या Gen-Z च्या मनावर फुंकर

Mumbai News: हजार कोटींच्या चार निविदा रद्द, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

RBI Repo Rate: RBIचा रेपो दराबाबत मोठा निर्णय! तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

Akola : गटाराच्या पाण्याने बनतोय नाश्ता; व्हिडिओ व्हायरल होताच मनपाची कारवाई, अतिक्रमण हटवले

SCROLL FOR NEXT