Loan Sakal
Personal Finance

Bank Loan Rates Hike: ग्राहकांना मोठा धक्का! आणखी एका बँकेने कर्ज केले महाग

Bank Loan Interest Rates Hike: गेल्या तीन वर्षांत कर्जदारांना त्यांच्या ईएमआयवर जास्त व्याजदर भरावा लागला आहे.

राहुल शेळके

Axis Bank: आणखी एका खाजगी बँकेने मार्जिनल कॉस्ट फंड आधारित कर्जदरात वाढ केली आहे. याचा अर्थ आता तुमच्या कर्जाचा EMI वाढेल. तसेच, ही वाढ 18 ऑगस्ट 2023 पासून लागू झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

आरबीआयचा रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे. ज्या बँकेने कर्जाचा व्याजदर वाढवला आहे ती अॅक्सिस बँक ही भारतातील तिसरी खाजगी बँक आहे. आता नवीन MCLR आधारित दर श्रेणी 8.95 टक्के ते 9.30 टक्क्यांच्या दरम्यान असेल. तीन वर्षे आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR दर 9.05 टक्के आणि 9.10 टक्के आहेत.

एका वर्षासाठी MCLR 9.15 टक्के, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी 9.25 टक्के आणि 9.30 टक्के आहे. असे बँकेने म्हटले आहे.

कर्जदारांवर काय परिणाम होईल

बँकेकडून MCLR मध्ये किंचित वाढ झाली आहे. यामुळे त्यांच्या कर्जाचा व्याजदर वाढेल आणि त्यांना पूर्वीपेक्षा किंचित जास्त ईएमआय भरावा लागेल. गेल्या तीन वर्षांत बहुतांश कर्जदारांना त्यांच्या ईएमआयवर जास्त व्याजदर भरावा लागला आहे.

'या' बँकांनी व्याजदरही वाढवले

Axis व्यतिरिक्त, HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि आणखी काही बँकांनी ऑगस्ट महिन्यात MCLR वाढवला आहे. रेपो दराबाबत आरबीआयच्या निर्णयापूर्वीच काही बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.

एमसीएलआर MCLR म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (Marginal Cost of Lending Rates) म्हणजेच MCLR हे किमान व्याज आहे ज्यावर बँका ग्राहकांना कर्ज देतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2016 मध्ये MCLR सुरू केला. MCLR दर बँका ठरवतात. जर MCLR कमी झाला किंवा वाढला तर कर्जाच्या ईएमआयमध्ये थेट फरक पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT