Adani Group  Sakal
Personal Finance

Adani Group: गौतम अदानींनी विकली 1,600 कोटींची कंपनी, अमेरिकन फर्मने 90% स्टेक घेतले विकत

कंपनीच्या विक्रीबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे.

राहुल शेळके

Bain Capital to acquire 90% stake in Adani Capital and Adani Housing

Adani Group: हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानींच्या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. अलीकडेच अदानी समूहाच्या दोन कंपन्या विकल्या गेल्या आहेत. विदेशी इक्विटी फर्म बेन कॅपिटलने अदानी समूहाच्या अदानी कॅपिटल आणि अदानी हाउसिंग या समूह कंपन्या विकत घेतल्या आहेत.

कंपनीच्या विक्रीबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे. या डील अंतर्गत, बेन कॅपिटलने अदानी कॅपिटल आणि अदानी हाउसिंगची 90% भागीदारी विकत घेतली आहे.

त्यानंतर आता या कंपनीचा केवळ 10% हिस्सा अदानी समूहाकडे शिल्लक आहे. ही 10% भागीदारी व्यवस्थापन, एमडी आणि सीईओ गौतम गुप्ता यांच्याकडे असेल.

अदानी समूहाने रविवारी जाहीर केले की अमेरिकन फर्म अदानी समूहाच्या अदानी कॅपिटलमधील 90% हिस्सा विकत घेऊन 120 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करेल.

1,440 कोटींना झाली डील

बेन कॅपिटलने अदानीच्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीची 90 टक्के भागीदारी 1,440 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. अदानी समूहाच्या अदानी कॅपिटलचे एकूण मूल्यांकन 1600 कोटी रुपये आहे.

अमेरिकन फर्मसोबतचा करार पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी म्हणाले की, आपण या करारावर खूप खूश आहोत. त्याचबरोबर अदानी कॅपिटलच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचे बेन कॅपिटलने सांगितले.

अदानी समूह 2017 मध्ये, अदानीने शॅडो बँकिंग व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून फारसा नफा मिळत नसल्याचे समूहाच्या लक्षात आले, त्यामुळे कंपनीने हा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आहे.

अदानी समूह अदानी कॅपिटलचा आयपीओ देखील आणणार होता, परंतु अमेरिकन फर्मची कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करण्यात स्वारस्य पाहून समूहाने ही शॅडो बँक विकली. विशेष म्हणजे, अदानी समूहाला त्यांचे सर्व नॉन-कोअर व्यवसाय विभाग बंद करायचे आहेत.

अदानी समूहाची अदानी कॅपिटलमध्ये 10 टक्के मालकी आहे. गौरव गुप्ता ही मालकी कायम ठेवणार आहे. ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कायम राहतील.

अदानी समूहाच्या या दोन कंपन्यांमधील भागभांडवल संपादन केल्यानंतर, बेन कॅपिटल या कंपनीमध्ये अतिरिक्त 120 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

हिंडेनबर्ग अहवाल आल्यापासून, अदानी समूह वेगवेगळ्या मार्गांनी निधी उभारण्याच्या योजनांवर काम करत आहे. अहवालात अदानी समूहाच्या कर्जापासून कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या अहवालानंतर कंपनी कर्ज कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT