Bank Holidays  Sakal
Personal Finance

Bank Holiday in August 2023: ऑगस्ट महिन्यात आहेत भरमसाठ सुट्या, ‘इतके' दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in August: जर तुम्हालाही ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर या महिन्याची बँक सुट्ट्यांची यादी नक्की पहा.

राहुल शेळके

Holidays In August 2023 : बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. खात्यातून पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करणे, जुन्या नोटा बदलणे इत्यादीसाठी बँकेत जावे लागते. जर तुम्हालाही ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर या महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी नक्की पहा.

ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. अशा परिस्थितीत ही यादी तपासून तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामांची यादी सहज बनवू शकता. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार, ऑगस्ट 2023 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील.

ऑगस्ट हा सुट्ट्यांचा महिना

विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असतात. सण, जयंती आणि शनिवार-रविवार यामुळे या महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.

याशिवाय ओणम, रक्षाबंधनामुळे देशातील अनेक भागात बँका बंद राहणार आहेत. तुम्हालाही पुढच्या महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करायची असतील, तर सुट्ट्यांच्या यादीनुसार नियोजन करा आणि बँकेशी संबंधित कामे या महिन्यातच पूर्ण करा.

ऑगस्टमध्ये इतके दिवस बँका बंद राहणार

  • 6 ऑगस्ट 2023 - रविवारमुळे संपूर्ण देशात सुट्टी असेल

  • 8 ऑगस्ट 2023 - गंगटोकमधील तेन्दोंग ल्हो रम फातमुळे सुट्टी असेल

  • 12 ऑगस्ट 2023- दुसऱ्या शनिवारी संपूर्ण देशात बँका बंद राहतील

  • 13 ऑगस्ट 2023- रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील

  • 15 ऑगस्ट 2023- स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील

  • 16 ऑगस्ट 2023- पारशी नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.

  • 18 ऑगस्ट 2023- गुवाहाटीमध्ये श्रीमंत शंकरदेव तिथीमुळे बँका बंद राहतील.

  • 20 ऑगस्ट 2023- रविवारी देशभरात बँका बंद राहतील

  • 26 ऑगस्ट 2023 - चौथ्या शनिवारी देशभरातील बँकांना सुट्टी असेल

  • 27 ऑगस्ट 2023- रविवारी देशभरातील बँकांना सुट्टी असेल

  • 28 ऑगस्ट 2023 - ओणममुळे कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील

  • 29 ऑगस्ट 2023 - तिरुओनममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी

  • 30 ऑगस्ट 2023- जयपूर आणि शिमल्यात रक्षाबंधनामुळे बँका बंद राहणार आहेत

  • 31 ऑगस्ट 2023 - डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरम येथे रक्षा बंधन / श्री नारायण गुरु जयंती / पंग-लबसोल मुळे बँक सुट्टी

बँका बंद असताना ग्राहकांनी काय करावे?

आजच्या काळात नवीन तंत्रज्ञानामुळे बँक बंद असतानाही ग्राहक बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. यासाठी ते नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा यूपीआय या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकता. त्याच वेळी, तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT