Bank Holidays in December 2023 Banking activities face disruption with strikes, holidays  Esakal
Personal Finance

December Bank Holiday: डिसेंबर महिन्यात इतक्या दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची यादी

Banks Holiday in December 2023 : डिसेंबर महिन्यात 18 दिवस बँका बंद राहणार आहेत.

राहुल शेळके

Banks Holiday in December 2023 : येत्या डिसेंबर महिन्यात 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकेशी संबंधित काम करायचे असेल तर आधी सुट्ट्यांची यादी पहा. सुट्ट्यांव्यतिरिक्त बँक संघटनांनी डिसेंबरमध्ये 6 दिवसांचा संप पुकारला आहे.

याशिवाय डिसेंबरमध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह 18 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. बँक सुट्ट्या राज्य आणि प्रदेशानुसार वेगवेगळ्या आहेत.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांची यादी जरूर पहा.

डिसेंबर महिन्यात अनेक सण आहेत. अशा स्थितीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 18 दिवस बँकांना सुट्टी असेल. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही ही सुट्टी असेल.

डिसेंबर 2023 मध्ये किती दिवस बँका बंद राहणार

1 डिसेंबर 2023: राज्य उद्घाटन दिनानिमित्त या दिवशी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये बँक सुट्टी असेल.

4 डिसेंबर 2023: सेंट फ्रान्सिस झेवियर सणानिमित्त गोव्यात बँकेला सुट्टी असेल.

9 डिसेंबर 2023: दुसऱ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

10 डिसेंबर 2023: रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.

12 डिसेंबर 2023: मेघालयमध्ये पा-टोगन नेंगमिंजा संगमामुळे बँकेला सुट्टी असेल.

13 डिसेंबर 2023: सिक्कीममध्ये लोसुंग/नामसुंगमुळे बँकेला सुट्टी असेल.

14 डिसेंबर 2023: सिक्कीममध्ये लोसुंग/नामसुंगमुळे बँकेला सुट्टी असेल.

17 डिसेंबर 2023: रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

18 डिसेंबर 2023: मेघालयमध्ये यू सोसो थामच्या पुण्यतिथीनिमित्त बँक सुट्टी असेल.

19 डिसेंबर 2023: गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील बँकांना सुट्टी असेल.

23 डिसेंबर 2023: चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

24 डिसेंबर 2023: रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

25 डिसेंबर 2023: ख्रिसमसनिमित्त देशभरात बँका बंद राहतील.

26 डिसेंबर 2023: मिझोरम, नागालँड आणि मेघालयमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

27 डिसेंबर 2023: नागालँडमध्ये ख्रिसमसनिमित्त बँका बंद राहतील.

30 डिसेंबर 2023: मेघालयमध्ये यू किआंग नांगबाहमुळे बँका बंद राहतील.

31 डिसेंबर 2023: रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

बँका बंद असताना ग्राहकांनी काय करावे?

सप्टेंबरमध्ये सणासुदीमुळे बँकांना सुट्या आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या दरम्यान रोख रक्कम हवी असेल तर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. याशिवाय तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं लॉबिंग, दोनवेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; कोकाटेंचा राजीनामा नाहीच? पण...

Asaduddin Owaisi: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका अन् ओवेसींचा संताप, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : सातारा, सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान व सैनिक करणार रक्तदान

झी मराठीवर लवकरच येतेय 'नागीण'; मुख्य भूमिका कोण साकारणार? प्रेक्षकांनी सुचवली 'या अभिनेत्रींची नावं

Stock Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स 296 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT