Bank Holidays in May 2024 Check the full list  Sakal
Personal Finance

Bank Holidays May: मे महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in May 2024: मे महिना येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, मे 2024 मध्ये बँका 12 दिवस बंद राहतील. यात दुसरा आणि चौथा शनिवारतचा देखील समावेश आहे.

राहुल शेळके

Bank Holidays in May 2024: मे महिना येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, मे 2024 मध्ये बँका 12 दिवस बंद राहतील. यात दुसरा आणि चौथा शनिवारचा देखील यात समावेश आहे.

याशिवाय लोकसभा निवडणुकीमुळे काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. मे महिन्यात रवींद्रनाथ टागोर यांची जयंती, अक्षय्य तृतीया असे अनेक सण आहेत, त्यामुळे बँकांचे कामकाज होणार नाही. सर्व राज्यांमध्ये बँका एकाच वेळी बंद राहणार नाहीत.

मे महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद?

  • 1 मे: महाराष्ट्र दिन/मे दिवस (कामगार दिन): बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद - आंध्र प्रदेश, हैदराबाद - तेलंगणा, इंफाळ, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथील बँका बंद राहतील.

  • 5 मे : रविवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.

  • 8 मे: रवींद्रनाथ टागोर यांची जयंती असल्याने बँका बंद राहणार आहेत.

  • 10 मे: बसव जयंती/अक्षय तृतीया असल्याने बँका बंद राहणार आहेत.

  • 11 मे: दुसरा शनिवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.

  • 12 मे : रविवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.

  • 19 मे : रविवार असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत.

  • 20 मे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, एप्रिल ते जून दरम्यान होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मुळे बेलापूर आणि मुंबईतील सर्व बँका 20 मे रोजी बंद राहतील.

  • 23 मे : बुद्ध पौर्णिमा आहे, आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, इटानगर, जम्मू, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर या राज्यातील सर्व बँका बुद्ध पौर्णिमेच्या सुट्टीनिमित्त बंद राहतील.

(List of Holidays in May 2024)

मे महिन्यात काही दिवस बँका बंद राहतील, मात्र या काळात ऑनलाइन सेवा सुरू राहतील. सुट्टीच्या दिवशी बँकेशी संबंधित काम असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकता. बँकांना सुटी असूनही सर्व ऑनलाइन आणि एटीएम सेवा सुरू राहणार आहेत. याशिवाय तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारेही डिजिटल पेमेंट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT