Bank Holidays  Sakal
Personal Finance

October Bank Holiday: ऑक्टोबर महिन्यात ‘इतक्या' दिवस बँका राहणार बंद, आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी जाहीर

Bank Holidays in October 2023: ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील?

राहुल शेळके

Bank Holidays in October 2023: सप्टेंबर महिना संपत आला आहे. यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये अनेक सण येणार आहेत. अशा परिस्थितीत बँकांना सुट्ट्या असणार आहेत. तुम्हालाही बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशानुसार, पुढच्या महिन्यात बँका काही दिवशी बंद राहतील. प्रादेशिक सुट्ट्या राज्य सरकार ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, पुढील महिन्यात देशभरात बँकांना एकूण 16 दिवस सुट्या असतील. महाराष्ट्रात एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. 

यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात 5 रविवार येतात. यासोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते म्हणजेच या 7 सुट्ट्या संपूर्ण देशात लागू होतील. अशा स्थितीत पुढील महिन्यात बँका कधी बंद राहणार आहेत ते जाणून घ्या.

Bank Holidays in October 2023

ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील?

  • 1 ऑक्टोबर- रविवार

  • 2 ऑक्टोबर- गांधी जयंती

  • 8 ऑक्टोबर- रविवार

  • 14 ऑक्टोबर- शनिवार

  • 15 ऑक्टोबर- रविवार

  • 22 ऑक्टोबर- रविवार

  • 24 ऑक्टोबर- दसरा/ विजयादशमी

  • 28 ऑक्टोबर- चौथा शनिवार

  • 29 ऑक्टोबर- रविवार

बँका बंद असताना ग्राहकांनी काय करावे?

बँका बंद असल्यास ग्राहक अनेक प्रकारची कामे डिजिटल पद्धतीने पूर्ण करू शकतात. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँकांच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT