Best Investment Plans esakal
Personal Finance

Best Investment Plans : महिलांनो, गुंतवणूक कुठे करावी कळत नाही? हे घ्या 5 वर्षांसाठी 5 बेस्ट पर्याय

आर्थिक नियोजनात योग्य गुंतवणूक योजना निवडणे फार आवश्यक असते.

धनश्री भावसार-बगाडे

Best Investment Plans For Men And Women In Marathi :

भविष्याची सोय म्हणून अनेक जण बचत, गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. पण नेमकी गुंतवणूक कुठे करावी हेच समजत नाही. कारण आर्थिक नियोजनात योग्य गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय निवडणे गरजेचे असते.

गुंतवणूक म्हणजे केवळ बचत नसून त्यात पैशांचा योग्य वापर आणि संपत्तीत वृद्धी असा दुहेरी हेतू असतो. त्यामुळे पुढील पाच वर्षात चांगल्या परताव्यासाठी तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवावे हे जाणून घेऊया.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS)

अल्प काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर ELSS ही सर्वात लोकप्रिय योजना मानली जाते. ही एक म्युच्युअल फंड योजना आहे. जी फंड व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केली जाते. या अंतर्गत तुमची रक्कम विविध मालमत्ता वर्गांमध्ये निश्चित सूत्रानुसार गुंतवला जातो. ही योजना शेअर बाजाराशी जोडलेली आहे, त्यामुळे जोखीम तर आहेच, पण तुम्हाला इथे चांगला परतावाही मिळतो.

युलिप (Unit Linked Insurance Plan)

युलिप किंवा युनिट लिंक्ड इन्शुरंस प्लॅन हे विमा आणि गुंतवणूक योजनांचे मिश्रण आहे. म्हणजे यात तुम्हाला दुहेरी फायदा मिळतो. शिवाय तुम्हाला प्रीमियम संरक्षण, वैविध्यपूर्ण मालमत्ता वाटप, पद्धतशीर पैसे काढण्याच्या पर्यायासह कर लाभ मिळताे. अनेक अनोख्या वेशिष्ट्यांमुळे पुढील ५ वर्षांसाठी पर्याय उत्तम ठरू शकतो.

एनएससी (National Savings Certificate)

ही सरकारी योजना हमी परतावा देते. ही योजना बँकेतील मुदत ठेव योजनेसारखी असून ५ वर्षांच्या लॉक इन कालावधीसह येते. यावर ७.७० टक्के दराने व्याज मिळेल. यावर तुम्ही वार्षिक व्याज परताव्यावर कर सूट घेऊ शकतात. गुंतवणुकीच्या मूळ रक्कमेवरही कर सूट उपलब्ध आहे.

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (Fixed Maturity Plan)

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन हा देखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. हा डेट आधारीत क्लोज एंडेड म्युच्युअल फंड आहे, ज्या अंतर्गत डेट इंस्ट्रूमेंट्समध्ये गुंतवणूक केली जाते. येथे तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.

लिक्वीड फंड (Liquid Funds)

लिक्वीड फंड हा म्युच्युअल फंड देखील आहे. तो ९१ दिवसांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येतो. तुम्ही अल्प कालावधीत उच्च तरलता असलेला पर्याय शोधत असाल तर हे फंड उत्तम आहे. हे फंड मार्केट लिंक्ड असल्यामुळे तुमचे फंड ज्या मालमत्तेशी जोडलेले आहेत त्यावर परतावा अवलंबून असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT