budget 2024 : Higher education  esakal
Personal Finance

Budget 2024: मेडिकल आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गिफ्ट, जाणून घ्या अर्थमंत्री काय म्हणाल्या, कोणाला काय मिळाले?

भविष्यात अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची आमचा प्रयत्न आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२४ चे अंतरिम बजेट सादर केले. यामध्ये त्यांनी शिक्षण या विषयासाठी खालील गोष्टींचा उल्लेख केला आहे.

सीतारामन म्हणाल्या, विविध सरकारी विभागांतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा वापर करून भविष्यात अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची आमचा प्रयत्न आहे.

यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांचा आढावा घेण्यात येईल. ही समिती सरकारला शिफारसी करेन असेही सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

सीतारामन यांनी देशातील उच्च शिक्षणातील संस्थांचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. त्या म्हणाल्या, नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून (national education policy) परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पीएम श्री शाळांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि पालनपोषण केले जात आहे. कौशल्य भारतच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख तरुणांना प्रशिक्षण दिलेले आहे. ५४ लाख तरुणांचे कौशल्य वाढवत पुन्हा प्रशिक्षित केले आहे.

देशात ३ हजार नवीन आयटीआय (ITI ) स्थापन केल्या आहेत. ७ आयआयटी, १६ आयआयआयटी ( IIIT), १६ AIIMS आणि ३९० विद्यापीठे मोठ्या संख्येने स्थापन झाली आहेत. या सोबतच येत्या काळात स्टार्टअप च्या माध्यमातून मोठी क्रांती घडविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT