Canada Pension Fund Sakal
Personal Finance

India-Canada: कॅनडाची भारतीय स्टार्टअप्समध्ये 21,400 कोटी रुपयांची गुंतवणूक, वादानंतर काय होणार परिणाम?

Canada Pension Fund: 2022 मध्ये भारत हा कॅनडाचा दहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश होता.

राहुल शेळके

Canada Pension Fund: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या आरोपावरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव आहे. भारताने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून कॅनडा हे दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले असल्याचे म्हटले आहे.

18 सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या वक्तव्यानंतर हा वाद सुरू झाला. याचा परिणाम आता स्टार्टअप कंपन्यांवर दिसून येत आहे.

कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डाने स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध नसलेल्या अनेक भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यात ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि ऑनलाइन इन्शुरन्स आणि क्लेम मॅनेजमेंट व्हेंचर स्टार्टअप अको यांचा समावेश आहे. ई-एज्युकेशन स्टार्टअप बायजूचा देखील यात समावेश आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डने (CPPIB) भारतीय स्टार्टअप्समध्ये 21,440.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. स्टार्टअप ट्रॅकर ट्रॅक्सनच्या डेटामधून या गोष्टी समोर आल्या आहेत.

कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डाची सर्वात मोठी गुंतवणूक Eruditus मध्ये आहे ज्यामध्ये फंडाने 7,633 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 6,663.6 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह फ्लिपकार्ट दुसऱ्या स्थानावर आहे. रिन्यू पॉवरमध्ये 2,310 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

अंदाजानुसार, कॅनडा पेन्शन फंडाची स्टार्टअप्ससह भारतीय लिस्ट आणि लिस्ट नसलेल्या कंपन्यांमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आहे. लिस्टेड स्टार्टअप्समध्ये लॉजिस्टिक कंपनी दिल्लीवेरी, पेटीएम, नायका आणि झोमॅटोचा समावेश आहे.

2022 मध्ये भारत हा कॅनडाचा दहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश होता. 2022-23 मध्ये भारताने कॅनडाला 4.10 अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तूंची निर्यात केली. 2021-22 मध्ये हा आकडा 3.76 अब्ज डॉलर होता.

तर कॅनडाने2022-23 मध्ये भारताला 4.05 अब्ज डॉलरच्या मालाची निर्यात केली. 2021-22 मध्ये हा आकडा 3.13 अब्ज डॉलर होता.

मात्र, भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेला वाद आणि संबंध बिघडल्याने आता दोन्ही देशांतील व्यापारी संबंध आणि गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) चे सहसंस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले. की, भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या राजकीय संबंधांचा दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यामागे त्यांनी असा युक्तिवाद केला की आर्थिक संबंध हे व्यावसायिक विचारांनी प्रेरित असतात. भारत आणि कॅनडा दोन्ही वेगवेगळ्या उत्पादनांचा व्यापार करतात. एकाच उत्पादनावर दोघांमध्ये स्पर्धा नाही. म्हणून, व्यापार संबंध वाढतच राहतील आणि दैनंदिन घडामोडींचा परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT