CarTrade Sakal
Personal Finance

CarTrade: कारट्रेडने OLXचा ऑटो विक्री व्यवसाय केला बंद, 4 महिन्यांपूर्वीच विकत घेतली होती कंपनी

CarTrade: कारट्रेड कर्मचार्‍यांशी संबंधित आणि इतर प्रशासकीय खर्चात कपात केली जाईल.

राहुल शेळके

CarTrade: आर्थिक अडचणीमुळे कारट्रेड भारतातील OLX India चा वाहन विक्री विभाग बंद करणार आहे. CarTrade Tech Limited ची उपकंपनी असलेल्या Sobek Auto ने OLX India चा ऑटो व्यवसाय विकत घेतला होता. हा करार जुलैमध्ये 537 कोटी रुपयांना झाला होता.

कारट्रेड काय म्हणाले?

कारट्रेडने यावेळी सांगितले की, सोबेक ऑटो इंडियाने ऑटो व्यवहार व्यवसायातील C2B ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कर्मचार्‍यांशी संबंधित आणि इतर प्रशासकीय खर्चात कपात केली जाईल. तसेच इतर खेळाडूंसोबत भागीदारीसाठी शोध घेतला जाईल.

OLX ने ​​अनेक देशांमध्ये ऑटो व्यवसाय बंद केला

जुलैमध्ये CarTradeने सोबेक ऑटो इंडियाला 537 कोटी रुपयांना विकत घेतले होते. सोबेक यांच्याकडे OLX इंडियाचा संपूर्ण व्यवसाय आहे. सोबेकने ऑटो व्यवसाय बंद करण्यासाठी OLX च्या मालकीची कंपनी Prosus चे अनुसरण केले आहे.

Prosus ने अनेक देशांमध्ये OLX ऑटो व्यवसाय बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या अंतर्गत कंपनीने अर्जेंटिना, मेक्सिको, कोलंबिया सारख्या देशांमध्ये ऑटो व्यवसाय बंद केला होता, ज्यामुळे 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले होते.

CarTrade Tech ला वॉरबर्ग पिंकस, टेमासेक, जेपी मॉर्गन आणि मार्च कॅपिटल्स सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे आणि ते मल्टीचॅनल ऑटो प्लॅटफॉर्म म्हणून काम करते. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर नवीन आणि वापरलेल्या दोन्ही कारच्या खरेदी-विक्रीची सेवा उपलब्ध आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सोबेक ऑटो इंडियाची उलाढाल सातत्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये, कंपनीने 556.42 कोटी रुपयांची उलाढाल होती, आर्थिक वर्ष 2021 मध्ये वाढून 592.28 कोटी रुपये झाली. यामुळे, आर्थिक वर्ष 2022 मध्ये, त्याच्या उलाढालीत एकूण 87 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि ती 1,110.40 कोटी रुपयांवर पोहोचली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT