Changes in TCS rate rbi lrs 20 percent TCS on remittances above Rs 7 lakh in financial year Sakal
Personal Finance

‘टीसीएस’ दरातील बदल

एका आर्थिक वर्षात परदेशात पाठवलेल्या सात लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर २० टक्के ‘टीसीएस’

डॉ. दिलीप सातभाई dvsatbhaiandco@gmail.com

भा रतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस) अंतर्गत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात अडीच लाख डॉलर इतकी रक्कम परदेशी पाठवू शकते. एक ऑक्‍टोबर २०२३ पासून, वैद्यकीय व शैक्षणिक उद्देश सोडून, एका आर्थिक वर्षात परदेशात पाठवलेल्या सात लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर २० टक्के ‘टीसीएस’ (टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स) द्यावा लागणार आहे.

शैक्षणिक खर्चासाठी सवलत

‘एलआरएस’ अंतर्गत, परदेशातील शिक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या सात लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर ‘टीसीएस’ लागणार नाही. परदेशी शिक्षणासाठी खर्च केलेल्या सात लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम एखाद्या मान्यताप्राप्त वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाद्वारे पाठवल्यास, त्यावर ०.५ टक्के दराने ‘टीसीएस’ आकारला जाईल. शैक्षणिक खर्चासाठी सात लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम कर्जाद्वारे न मिळाल्यास पाच टक्के ‘टीसीएस’ लागेल.

वैद्यकीय उपचारांसाठी अल्प कर

परदेशातील वैद्यकीय उपचारांसाठी सात लाख रुपयांवरील रकमेवर पाच टक्के दराने ‘टीसीएस’ द्यावा लागेल. अर्थ मंत्रालयानुसार, शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी लागू असलेल्या दरानेच शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांशी संबंधित प्रवास आणि अनुषंगिक खर्चासाठी ‘टीसीएस’ आकारला जाईल.

परदेशप्रवास खर्चावर २० टक्के

एका आर्थिक वर्षात सात लाख रुपयांपर्यंतच्या परदेश प्रवासाच्या खर्चावर, एक ऑक्टोबर २०२३ पासून पाच टक्के ‘टीसीएस’ लागू होईल, तर सात लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चासाठी २० टक्के दराने लागू होईल.

परदेशातील गुंतवणूक

एका आर्थिक वर्षात परदेशातील शेअर बाजार, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सी किंवा मालमत्तेमध्ये सात लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असल्यास, त्यावर २० टक्के दराने टीसीएस लागू होईल. तथापि, परदेशी शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या देशांतर्गत म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली असल्यास, ती गुंतवणूक ‘एलआरएस’ अंतर्गत रेमिटन्स म्हणून मानली जाणार नाही, त्यामुळे त्यावर ‘टीसीएस’ लागणार नाही.

फॉरेक्स कार्डद्वारे पेमेंट

क्रेडिट कार्डद्वारे केले जाणारे पेमेंट ‘एलआरएस’च्या कक्षेत येत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ‘टीसीएस’ आकारणी होणार नाही. तथापि, डेबिट कार्ड किंवा फॉरेक्स कार्डद्वारे केलेले पेमेंट ‘एलआरएस’ अंतर्गत येते. डेबिट किंवा फॉरेक्स कार्ड वापरून सात लाख रुपये खर्च केल्यास २० टक्के दराने ‘टीसीएस’ आकारला जाईल. एका वर्षात अनेक अधिकृत डीलर किंवा बँका किंवा आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डांद्वारे केलेल्या खर्चाचे स्वतंत्र मूल्यांकन केले जाणार नाही.

‘टीसीएस’ खर्च आहे का?

‘टीसीएस’ हा ‘२६ ए एस’ मध्ये टॅक्स क्रेडिट म्हणून दर्शविला जातो. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना देय कराच्या संदर्भात पैसे भरल्याचा दावा केला जाऊ शकतो. आगाऊ कर भरताना व्यक्ती ती रक्कम ऑफसेटदेखील करू शकते. ज्यांना देय कर किंवा इतर कोणत्याही स्वरूपात ही रक्कम ऑफसेट करता येत नाही, त्यांच्यासाठी, ‘आयटीआर’ दाखल केल्यानंतर ती रिफंड म्हणून उपलब्ध होऊ शकते, हे लक्षात घेतले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT