LPG Gas Cylinder  Esakal
Personal Finance

Gas Cylinder Price: सणासुदीत सरकारचं आणखी एक गिफ्ट! व्यावसायिक सिलेंडच्या दरात मोठी कपात, किती झाला स्वस्त?

LPG Gas Cylinder Price Cut: स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.

राहुल शेळके

LPG Gas Cylinder Price Cut: स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी एलपीजीच्या किंमतीत 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या (OMC) मते, आता LPG ग्राहकांना नवी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरसाठी 1,522 रुपये मोजावे लागतील. कोलकात्यात 19 किलो एलपीजी गॅसची किंमत 1,636 रुपये, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,482 रुपये आणि चेन्नईमध्ये 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1,695 रुपये झाली आहे.

विशेष म्हणजे महिलांसाठी सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी घरगुती गॅसच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. त्याच वेळी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी किंमत प्रति सिलिंडर 400 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

दोन महिन्यांत व्यावसायिक सिलिंडमध्ये 250 रुपयांहून अधिक कपात

आयओसीएलच्या वेबसाइटनुसार, गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीही कमी करण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्यातील कपात आणि आजच्या कमी झालेल्या किंमतीनंतर, व्यावसायिक सिलिंडरवर एकूण 250 रुपयांपेक्षा जास्त कपात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT