Credit Card Sakal
Personal Finance

Credit Card: क्रेडिट कार्डचा आनंद मोठा, खर्चाला नाय तोटा! भारतीयांनी केला नवा रेकॉर्ड

क्रेडिट कार्डवरील खर्चात मोठी वाढ होत आहे.

राहुल शेळके

Credit Card Spending in May: देशात मोठ्या ते छोट्या शहरांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे. क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केल्यास ते फायदेशीर ठरते. मात्र, तुम्ही त्याचा हुशारीने वापर केला नाही तर क्रेडिट कार्ड तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकते. 

मे महिन्यात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारा खर्च 1.4 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. क्रेडिट कार्डवरील खर्चात महिना-दर-महिना आधारावर पाच टक्क्यांनी वाढला आहे.

क्रेडिट कार्डच्या संख्येत वाढ

2023 च्या सुरुवातीपासून क्रेडिट कार्डची संख्या 5 दशलक्ष (50 लाख) ने वाढली आहे आणि 87.4 दशलक्ष (8.74 कोटी) च्या आकड्याला स्पर्श केला आहे. आरबीआयच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दोन महिन्यांत दोन दशलक्ष क्रेडिट कार्ड जोडले गेले आहेत.

देशात जानेवारी 2023 मध्ये क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 82.4 दशलक्ष (8.24 कोटी), फेब्रुवारीमध्ये 83.3 दशलक्ष (8.33 कोटी), मार्चमध्ये 85.3 दशलक्ष (8.53 कोटी) आणि एप्रिलमध्ये 86.5 दशलक्ष (8.65 कोटी) पोहोचली आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचा खर्च 1.1 लाख कोटी ते 1.2 लाख कोटी दरम्यान होता. मे महिन्यात 1.4 लाख कोटी झाला. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, क्रेडिट कार्डवर सरासरी 16,144 रुपये खर्च झाला आहे.

देशातील सर्वात मोठ्या क्रेडिट कार्ड बँका

  • HDFC बँक - 1.81 कोटी

  • SBI बँक- 1.71 कोटी

  • ICICI बँक - 1.46 कोटी

  • अॅक्सिस बँक - 1.24 कोटी

90 दिवसांपेक्षा जास्त काळ क्रेडिट कार्ड बिल न भरणाऱ्यांची संख्या 2.94 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 0.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT