DA Hike update Central govt employees may get 4 percent hike in DA in March under 7th Pay Commission  Sakal
Personal Finance

DA Hike: होळीपूर्वी लाखो लोकांना मोदी सरकार देणार गिफ्ट; पगार आणि पेन्शन 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार

7th Pay Commission: महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळू शकते. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करू शकते

राहुल शेळके

DA Hike Latest Update: महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळू शकते. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करू शकते, ज्याचा थेट फायदा लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होऊ शकतो. (DA Hike update Central govt employees may get 4 percent hike in DA in March under 7th Pay Commission)

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्चमध्ये वाढण्याची शक्यता आहे. यात 4 टक्क्यांनी वाढ होईल. एकूण महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचेल. मार्चमध्ये महागाई भत्ता वाढल्यानंतर तो नव्या पद्धतीने मोजला जाईल. पुढील महागाई भत्त्याची आकडेवारी 29 फेब्रुवारीपासून येण्यास सुरुवात होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते. याअंतर्गत सरकार जानेवारी महिन्यात पहिली आणि जुलैमध्ये दुसरी दुरुस्ती करते. केंद्र सरकार पुढच्या महिन्यात मोठा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना होळीची भेट देऊ शकते अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला होता

ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करून भेट दिली होती आणि या वाढीसह त्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला होता. आता या वेळीही महागाईच्या दरानुसार सरकार पुन्हा 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मार्चमध्ये त्याची घोषणा केली जाईल, तेव्हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2024 पासून त्याचे फायदे मिळतील. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

महागाई भत्त्याची तरतूद का करण्यात आली?

महागाई भत्ता हा पगाराचा एक भाग आहे. त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो, त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो.

कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कमाईचे महागाईच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी सातव्या वेतन आयोगाने डीए आणि डीआरची तरतूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT