Adani Port Sakal
Personal Finance

Adani Group: गौतम अदानींना मोठा धक्का! डेलॉइटने सोडले कंपनीचे काम; पुढे काय होणार?

Adani Port: डेलॉइटने कंपनीच्या व्यवहारांबद्दल चिंता व्यक्त केली होती

राहुल शेळके

Adani Group: अदानी समूहाला या वर्षात बरेच चढ-उतार पहावे लागले आहेत. हिंडेनबर्ग अहवालामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच अदानी समूहाला मोठा झटका बसला होता. त्यावेळी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर नकारात्मक परिणाम झाला.

आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या एका कंपनीला झटका बसला आहे. खरं तर, डेलॉइटने अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) या अदानी समूहाच्या कंपनीचे ऑडिटचे काम सोडले आहे.

अदानी पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने MSKA आणि असोसिएट्स चार्टर्ड अकाउंटंट्सची नवीन ऑडिटर म्हणून निवड जाहीर केली आहे. ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी डेलॉइटने आपल्या ऑडिटर पदाचा राजीनामा दिला होता. डेलॉइट हे अदानी पोर्टशी बराच काळ संबंधित होते.

Deloitte मे 2017 पासून APSEZ चे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून काम करत होते आणि जुलै 2022 मध्ये तिचा कार्यकाळ आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला.

मात्र, डेलॉइट आणि अदानी यांच्या कंपनीच्या बैठकीनंतर लेखापरीक्षक पदाचा राजीनामा देण्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. आता नवीन लेखापरीक्षक एमएसकेए अँड असोसिएट्स यांनी कामाची जबाबदारी स्वीकारतील.

APSEZ च्या लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष GK पिल्लई म्हणाले की, लेखापरीक्षण समितीला APSEZ चे ऑडिटर म्हणून BDO इंटरनॅशनलच्या टॉप 6 ग्लोबल ऑडिट फर्म्सची सदस्य फर्म M/s MSKA & Associates यांची नियुक्ती करण्यात आनंद होत आहे.

राजीनामा परस्पर संमतीने

डेलॉइटला अदानी पोर्टचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून काम चालू ठेवायचे नव्हते. अशा स्थितीत दोघांमध्ये बैठक होऊन परस्पर सहमतीने राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अदानी पोर्टने सर्व माहिती दिली

ऑडिट समितीचे अध्यक्ष गोपाल कृष्ण पिल्लई यांनी सांगितले की, अदानी पोर्टने डेलॉइटला सर्व माहिती पुरवली आहे. डेलॉइटने 12 ऑगस्टच्या राजीनामा पत्रातही याबाबत माहिती दिली आहे. डेलॉइटने राजीनाम्यात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 मधील सर्व माहिती कंपनीने पुरेशी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

Hormuz Strait: करार नाही, तणाव कायम… तरी होर्मुझमधून GOOD NEWS! जे घडलं ते जगाला थक्क करून गेलं! १६ जहाजांची धडाकेबाज एंट्री

Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Induction Safety Tips : इंडक्शन स्टोव्हजवळ अजिबात ठेऊ नका 'या' 5 वस्तू; नाहीतर लगेच होतील खराब, इंडक्शनही जळेल

SCROLL FOR NEXT