Disney Plans To Layoff 4k Employees In April, Asks Managers To Identify Candidates Report Sakal
Personal Finance

Disney layoff : डिस्नेचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! पुन्हा एकदा 'इतक्या' कर्मचाऱ्यांना पाठवणार घरी

गेल्या काही महिन्यांतील मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Disney layoff : मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिस्नेमध्ये एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होऊ शकते. जगभरातील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये, ही कंपनी 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. संस्थेचा खर्चाचे बजेट कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.

बिझनेस इनसाइडरने सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना एप्रिलमध्ये प्रस्तावित कर्मचारी कपात करण्याचे सांगितले आहे. (Disney Plans To Layoff 4k Employees In April, Asks Managers To Identify Candidates Report)

मात्र, टप्याटप्याने कर्मचारी कपात केली जाणार की सर्व 4 हजार कर्मचाऱ्यांना एकाचवेळी काढून टाकले जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 3 एप्रिल रोजी डिस्नेच्या प्रस्तावित वार्षिक बैठकीपूर्वीच्या नियोजित नोकऱ्या कपातीची घोषणा करण्यात आली होती.

कंपनी हुलूच्या स्ट्रीमिंग सेवेमध्ये भविष्यात काय करायचे यावरही चर्चा करत आहे. Hulu स्ट्रीमिंग सेवेमध्ये सामान्य-मनोरंजन शो आहेत आणि ते दोन तृतीयांश डिस्नेच्या मालकीचे आणि एक तृतीयांश कॉमकास्ट कॉर्पचे आहे.

यापूर्वी, सीईओ बॉब इगर यांनी खर्च कमी करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये 7,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केली होती. यासाठी कोट्यवधी डॉलर्स वाचवता यावेत यासाठी निर्णय घेतला होता.

डिस्नेच्या 2021 च्या वार्षिक अहवालानुसार, जगभरात कंपनीचे 1,90,000 कर्मचारी आहेत. त्यापैकी 80 टक्के पूर्णवेळ आहेत.

डिस्ने प्लस हॉटस्टारचे भारतातील ओटीटी मार्केटवर वर्चस्व आहे. भारतीय ओटीटी मार्केटमध्ये हॉटस्टारचा बाजार हिस्सा 29% च्या जवळ आहे. Amazon कडे 1.70 कोटी, Netflix कडे 50 लाख तर Disney Plus Hotstar चे 5 कोटी पेक्षा जास्त सशुल्क सदस्य आहेत.

अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात :

गेल्या काही महिन्यांतील मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. डेल कंपनीने 6,650 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

त्याच वेळी, दिग्गज कंपनी Google ने जानेवारी 2023 पासून आतापर्यंत एकूण 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. याशिवाय ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, मायक्रोसॉफ्ट यांनीही कर्मचारी कपात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT