HCL Technologies Ltd has declared dividend sakal
Personal Finance

HCL Dividend : एचसीएल टेककडून डिव्हिडेंड जाहीर, रेकॉर्ड डेटही निश्चित...

HCL Dividend latest news in marathi : शेअरहोल्डर्सनाही एक्स्ट्रा बेनेफिट मिळणार आहे कारण कंपनीने 2 रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवर 12 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

एचसीएलच्या (HCL) शेअर्सनी त्यांच्या शेअरहोल्डर्सना कायमच चांगला नफा मिळवून दिला आहे. अशात नुकतेच एचसीएलचे निकाल आले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षाची पहिली तिमाही कंपनीसाठी बाजाराच्या अंदाजापेक्षा चांगली होती.

आता शेअरहोल्डर्सनाही एक्स्ट्रा बेनेफिट मिळणार आहे कारण कंपनीने 2 रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवर 12 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला आहे. कंपनीने या अंतरिम डिव्हिडेंडसाठी रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे आणि ती 23 जुलै 2024 आहे. हा डिव्हिडेंड 1 ऑगस्ट 2024 पर्यंत शेअरहोल्डर्सच्या खात्यात पाठवला जाईल.

एचसीएल टेकचा जून तिमाहीत कंसालिडेटेड नेट प्रॉफिट वार्षिक 20 टक्क्यांनी वाढून 4257 कोटीवर पोहोचला आहे. या कालावधीत त्याचा ऑपरेशनल रेव्हेन्यू 6.7 टक्क्यांनी वाढून 28,057 कोटी झाला आहे.

या आर्थिक वर्ष 2025 साठी, कंपनीने कॉन्स्टंट करन्सी टर्म बाबतीत पुन्हा 3-5 टक्के महसूल वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये तो 5-5.5 टक्के होते. ऑपरेटिंग EBIT मार्जिन गायडन्स देखील आर्थिक वर्ष 2025 साठी पुन्हा 18-19 टक्के करण्यात आले आहे.

टीसीएस आणि इन्फोसिसनंतर देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचसीएल टेकच्या शेअर्सची निकालापूर्वी जोरदार खरेदी झाली. यामुळे बीएसईवर तो 3.20 टक्क्यांच्या वाढीसह 1560.40 रुपयांवर बंद झाला. इंट्रा-डेमध्ये त्याने 1565.50 रुपयांचा उच्चांक गाठला.

गेल्या वर्षी 13 जुलै 2023 रोजी हा शेअर 1,087.75 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. या स्तरावरून, 7 महिन्यांत सुमारे 56 टक्क्यांनी वाढत 23 फेब्रुवारी 2024 रोजी तो 1,696.50 रुपयांवर पोहोचला, जो त्याच्या शेअर्ससाठी विक्रमी उच्चांक आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT