Domino's Pizza Price Sakal
Personal Finance

Domino's Pizza: वर्ल्डकपपूर्वी डॉमिनोजचं मोठं गिफ्ट! पिझ्झाच्या किंमतीत केली 40 टक्के कपात

Domino's big gift before the World Cup: डॉमिनोजने पिझ्झा प्रेमींना मोठा दिलासा दिला आहे.

राहुल शेळके

Domino's Pizza Price:

क्रिकेट वर्ल्डकप 2023 उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होत आहे. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. अनेक महिन्यांपासून चाहते या वर्ल्डकपची वाट पाहत होते.

कारण क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे वर्ल्डकप भारतात होत आहे. यातच आता डॉमिनोजने पिझ्झा प्रेमींना मोठा दिलासा दिला आहे.

आपल्यापेक्षा लहान आणि नवीन कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी डोमिनोजने वर्ल्डकपपूर्वी मोठ्या आकाराच्या पिझ्झाच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. आता तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील ते पहा.

डॉमिनोजने आपल्या मोठ्या आकाराच्या पिझ्झाची किंमत 40 टक्क्यांनी कमी केली आहे. यासोबतच कंपनीने Everyday Value & Howzzat ऑफरवर मोठ्या कपातीची घोषणा केली आहे.

डॉमिनोजने व्हेज लार्ज पिझ्झाची किंमत थेट 799 रुपयांवरून 499 रुपयांपर्यंत कमी केली आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठीही एक आनंदाची बातमी आहे. डॉमिनोजने नॉनव्हेज लार्ज साइज पिझ्झाची किंमत 919 रुपयांवरून 549 रुपयांपर्यंत कमी केली आहे.

गेल्या काही वर्षांत लोकांच्या उत्पन्नात वाढ आणि जीवनशैलीत सुधारणा झाल्यानंतर लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढली होती. मात्र, आता वाढत्या महागाईमुळे लोकांचा खर्च कमी होत आहे. भारतातील डॉमिनोजसारख्या कंपन्यांसाठी हे वर्ष चांगले राहिले नाही. भविष्यात या ब्रँड्स समोरील आव्हाने वाढताना दिसत आहेत. कारण डॉमिनोजचा सेल यावर्षी कमी झाला आहे.

डोमिनोजने पिझ्झा हट आणि बर्गर किंग सारख्या फास्ट फूड ब्रँड्सना त्यांचे धोरण बदलण्यास भाग पाडले आहे. कारण डोमिनोजने पिझ्झाच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या कंपन्यांना त्यांचा बाजारातील हिस्सा कायम ठेवायचा आहे. भारतासारख्या देशात, जिथे फास्ट फूड म्हणून समोसाची किंमत फक्त 10 रुपये आहे, कंपन्यांना त्यांचा बाजारातील हिस्सा कायम ठेवणे हे एक आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

Latest Marathi News Update : पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

Pune Rainfall : पुण्यावर वरुणराजाची कृपेची सावली! मुळशी, पवना, खडकवासल्यात मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पर्जन्यमान, ताजी आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT