Donald Trump to pay 400,000 dollar in legal charges to The New York Times and its reporters  Sakal
Personal Finance

ट्रम्प यांना मोठा झटका! न्यूयॉर्क टाइम्स आणि तीन पत्रकारांना द्यावे लागणार 400,000 डॉलर; काय आहे प्रकरण?

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अमेरिकेतील एका न्यायालयाने फसवणूक प्रकरणात न्यूयॉर्क टाइम्स आणि तीन पत्रकारांना चार लाख डॉलर्स देण्याचे आदेश दिले आहेत.

राहुल शेळके

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अमेरिकेतील एका न्यायालयाने फसवणूक प्रकरणात न्यूयॉर्क टाइम्स आणि तीन पत्रकारांना चार लाख डॉलर्स देण्याचे आदेश दिले आहेत.

न्यूयॉर्कच्या एका न्यायाधीशाने शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्क टाइम्सला कायदेशीर शुल्क म्हणून 392,638 डॉलर भरण्याचे आदेश दिले. हे प्रकरण कर्ज फसवणुकीशी संबंधित आहे.

मिंटच्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर काही पत्रकारांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या संपत्तीचा खुलासा केला होता. ज्यात पत्रकारांनी दावा केला होता की ट्रम्प यांनी कर्ज घेण्यासाठी त्यांच्या संपत्तीची चुकीची माहिती देली होती.

ट्रम्प यांनी पत्रकारांसह संस्थेवर गुन्हा दाखल केला

त्यामुळे ट्रम्प नाराज झाले आणि त्यांनी पत्रकारांसह संस्थेवर गुन्हा दाखल केला. अशा परिस्थितीत या प्रकरणी सुनावणीदरम्यान ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. आता न्यायालयाने पत्रकार आणि संस्थेची या खटल्यापासून सुटका केली आहे आणि ट्रम्प यांना कायदेशीर शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी मे महिन्यात न्यायाधीश रॉबर्ट रीड यांनी वृत्तपत्र आणि तीन पत्रकार (सुझान क्रेग, डेव्हिड बारस्टो आणि रसेल ब्युटनर) यांच्याविरुद्धचा खटला फेटाळून लावला होता. ताज्या सुनावणीदरम्यान, रीड यांनी सांगितले की प्रकरणांची गुंतागुंत आणि प्रकरणातील इतर घटक पाहता, ट्रम्प यांना टाइम्स आणि पत्रकारांना कायदेशीर शुल्क म्हणून 392,638 डॉलर द्यावे लागतील.

पत्रकारांना गप्प करणाऱ्यांसाठी हा संदेश

न्यायालयाच्या निर्णयानंतर, टाइम्सचे प्रवक्ते डॅनियल रोड्स म्हणाले की, आजच्या निर्णयावरून असे दिसून येते की राज्याचा नवीन सुधारित SLAPP विरोधी कायदा प्रेसच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, न्यायालयीन व्यवस्थेचा गैरवापर करून पत्रकारांना गप्प करू इच्छिणाऱ्यांना न्यायालयाने संदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT