Economist Thomas Piketty Research Sakal
Personal Finance

Tax: भारतातील आर्थिक असमानता ऐतिहासिक उच्चांकावर; श्रीमंतांवर कर लावावा, अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटींची शिफारस

Inheritance Tax: भारतातील वाढती असमानता दूर करण्यासाठी, 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांवर 2 टक्के कर लावावा आणि 33 टक्के वारसा कर लावण्याची गरज आहे.

राहुल शेळके

Economist Thomas Piketty Research: भारतातील वाढती असमानता दूर करण्यासाठी, 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांवर 2 टक्के कर लावावा आणि 33 टक्के वारसा कर लावण्याची गरज आहे. अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या शोधनिबंधात ही शिफारस करण्यात आली आहे.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांनी ‘भारतातील टोकाची असमानता दूर करण्यासाठी संपत्ती कराचा प्रस्ताव’ हा संशोधन अहवाल तयार करण्यात हातभार लावला आहे. रिसर्च पेपरमध्ये श्रीमंत लोकांवर 2 टक्के दराने संपत्ती कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच संशोधनात 33 टक्के वारसा कराचीही बाजू मांडण्यात आली आहे.

संशोधनानुसार, ज्यांची एकूण संपत्ती 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यावर 2 टक्के संपत्ती कर आणि 33 टक्के वारसा कर लावण्याची गरज आहे. त्यामुळे आर्थिक विषमता दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच अर्थव्यवस्थेला मोठा लाभ मिळू शकतो. यामुळे सरकार सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच जीडीपीच्या 2.73 टक्के इतका मोठा महसूल मिळवू शकते.

निवडणुकीदरम्यान अहवाल समोर आला

देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना श्रीमंतांवर कर लादण्याची शिफारस करणारा हा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या प्रक्रियेनुसार आज शनिवारी सहाव्या टप्प्याचे मतदान होत आहे. यानंतर 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.

खूप कमी लोक प्रभावित होतील

रिसर्च पेपरमध्ये अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांवर प्रस्तावित कर लादला गेला तर त्याचा फार कमी लोकांवर परिणाम होणार आहे. अहवालानुसार, 99.96 टक्के लोक या दोन्ही प्रस्तावित करांमुळे प्रभावित होणार नाहीत, कारण 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची टक्केवारी खूपच कमी आहे.

आर्थिक विषमता खूप वाढली आहे

भारतातील आर्थिक विषमतेबाबत अनेक अहवाल आणि संशोधनांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या संशोधनात असेही म्हटले आहे की 2014-15 ते 2022-23 या काळात देशात आर्थिक विषमता झपाट्याने वाढली आणि श्रीमंत लोकांकडे जास्त संपत्ती जमा होत राहिली.

2022-23 पर्यंत, देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी फक्त 1 टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती होती. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, अमेरिकेसह अनेक देशांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT