Money Laundering Case RK Arora Arrest Sakal
Personal Finance

RK Arora Arrest: ईडीची मोठी कारवाई, सुपरटेकचे अध्यक्ष आर. के अरोरा यांना केली अटक; काय आहे प्रकरण?

अंमलबजावणी संचालनालयाने रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आर के अरोरा यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.

राहुल शेळके

Money Laundering Case RK Arora Arrest: अंमलबजावणी संचालनालयाने रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आर के अरोरा यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अंमलबजावणी संचालनालयाने 25 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

या मालमत्तांची किंमत 40.39 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. या मालमत्ता सुपरटेक ग्रुप ऑफ कंपनीज आणि त्यांच्या संचालकांच्या होत्या आणि या मालमत्ता उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये होत्या. ईडीने मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदीनुसार या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

या राज्यांच्या पोलिसांनी एफआयआर केली दाखल:

दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने आर के अरोरा यांना मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत अटक केली आहे.

ईडीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी आणि तिच्या संचालकांनी संभाव्य खरेदीदारांकडून बुक केलेल्या फ्लॅटसाठी आगाऊ रक्कम गोळा करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

संचालक या लोकांना वेळेत फ्लॅटचा ताबा देण्यात अपयशी ठरले आहेत. ईडीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीने जनतेच्या पैशाची फसवणूक केली आहे.

ईडीच्या प्रवक्त्याने तपासाचा हवाला दिला

प्रवक्त्याने पुढे सांगितले की, सुपरटेक लिमिटेड आणि ग्रुप कंपन्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले आणि बँका आणि वित्तीय संस्थांकडून विशिष्ट मुदतीचे कर्ज घेतले असे तपासात आढळून आले आहे. मात्र, या निधीचा दुरुपयोग करून इतर समूह कंपन्यांच्या नावे जमीन खरेदी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT