SBI Sakal
Personal Finance

High Court: "शैक्षणिक कर्जासाठी सीबील गरजेचे आहे का ?" उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! SBI चे पिळले कान

विद्यार्थ्याने बँकेला शैक्षणिक कर्ज मागितले होते.

राहुल शेळके

Kerala High Court: आर्थिक गरजा भागविण्यासाठी आपण कर्ज घेतो. पण बँकेकडून कर्ज देण्यापूर्वी बँक तुमचा सिबिल स्कोअर नक्की तपासून घेते. कारण सिबिल स्कोअरच्या आधारे तुम्हाला बँकेकडून कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते.

सिबिल स्कोअर 300 ते 900 दरम्यान निश्चित केला जातो. सर्वसाधारणपणे 750 किंवा त्यापेक्षा जास्त पर्यंत सिबिल स्कोअर चांगला मानला जातो.

जर तुमचा सिबिल स्कोअर खूप कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे कठीण होऊ शकते. असेच एक प्रकरण केरळ उच्च न्यायालयात पोहचले आहे.

विद्यार्थ्याने बँकेला शैक्षणिक कर्ज मागितले आणि त्या विद्यार्थ्याचा CIBIL स्कोअर कमी असल्यामुळे बँकेने कर्जाचा अर्ज नाकारला. या प्रकरणावर केरळ उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन यांनी 'नोएल पॉल फ्रेडी विरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया अँड एनआर' या खटल्याची सुनावणी करताना असे निरीक्षण नोंदवले की बँकांनी शैक्षणिक कर्जाच्या अर्जांचा विचार करताना मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.

केरळ उच्च न्यायालयाने सांगितले की विद्यार्थ्याने सादर केलेला शैक्षणिक कर्ज अर्ज कमी CIBIL स्कोअरमुळे नाकारला जाऊ शकत नाही.

न्यायालयाने सांगितले की, "विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांना भविष्यात या देशाचे नेतृत्व करायचे आहे. फक्त, शैक्षणिक कर्जासाठी अर्जदार असलेल्या विद्यार्थ्याचा कमी CIBIL स्कोअर असल्यामुळे बँकेने अर्ज नाकारु नये"

दोन कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली होती. त्याचे एक कर्ज बँकेने माफ केले तर एक 16,667 रुपये थकीत होते ज्यामुळे CIBIL स्कोअर कमी झाला.

विद्यार्थ्याची ओमानमध्ये नोकरी लागली असल्याने याचिकाकर्त्याला आता संपूर्ण कर्जाची रक्कम क्लिअर करता आली पाहिजे असे वकिलांनी सांगितले.

न्यायालयाने प्रतिवादींना रु.4,07,200/- ची रक्कम याचिकाकर्त्याच्या कॉलेजला वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

''या प्रक्ररणात याचिकाकर्त्याला नोकरीची मिळाली आहे. पण न्यायालय वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाही,” असे न्यायालयाने निरीक्षण केले.

याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ अधिवक्ता जॉर्ज पुन्थोत्तम आणि अधिवक्ता निशा जॉर्ज आणि अॅन मारिया फ्रान्सिस यांनी केले. एसबीआयचे स्थायी वकील जितेश मोन, वरिष्ठ अधिवक्ता के.के. चंद्रन पिल्लई आणि प्रतिवादींच्या वतीने प्रतिनिधित्व करत होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकी आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये कोळशेवाडी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरटा जेरबंद, १० मोटरसायकली जप्त

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT