RBI Monetary Policy Committee Meet Sakal
Personal Finance

RBI MPC: निवडणूक निकालानंतर RBIची पहिली बैठक; EMI वर उद्या होणार निर्णय

RBI Monetary Policy Committee Meet: लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. तुमच्या कर्जाचा EMI वाढेल की नाही किंवा तुम्हाला दिलासा मिळेल की नाही याचा निर्णय उद्या म्हणजेच 7 जून रोजी होणार आहेत.

राहुल शेळके

RBI Monetary Policy Committee Meet: लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. तुमच्या कर्जाचा EMI वाढेल की नाही किंवा तुम्हाला दिलासा मिळेल की नाही याचा निर्णय उद्या म्हणजेच 7 जून रोजी होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक 5 तारखेपासून सुरू झाली असून, त्याबाबतचा निर्णय शुक्रवारी होणार आहे. 7 जून रोजी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास रेपो दराबाबतच्या निर्णयाची माहिती देतील. सध्याचा रेपो दर 6.50% आहे. रेपो दरात गेल्या 7 वेळा कोणताही बदल झालेला नाही.

नवीन आर्थिक वर्षातील एमपीसीची ही दुसरी बैठक आहे. मजबूत आर्थिक वाढ आणि अनिश्चित चलनवाढीच्या दृष्टीकोनातून शुक्रवारी होणाऱ्या धोरण आढाव्यात आरबीआयने आपली कठोर आर्थिक भूमिका कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. देशात निवडणुकीचे निकाल लागले आहेत. देशात भाजपच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार स्थापन होणार आहे. अशा परिस्थितीत सरकार स्थापन होण्यापूर्वी गृहकर्जाचा ईएमआय कमी होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.

तज्ञांचे मत काय आहे?

अर्थतज्ज्ञ प्रणव सेन यांच्या मते, निवडणुकीचे निकाल पाहता, तेच लोक सरकारमध्ये असले तरी ते त्याच भूमिकेवर ठाम राहतील की नाही, हे येत्या काही दिवसांतच ठरेल. त्यामुळे अनिश्चिततेची पातळी खूप वाढली आहे. हे आरबीआयला लक्षात ठेवावे लागेल.

SBI च्या सौम्या कांती घोष यांच्या मते, सरकार 5% पेक्षा किंचित कमी, शक्यतो 4.9% ते 5% च्या तुटीसह काम करू शकते. महागाई लवकरच ती 4% पर्यंत खाली जाणार नाही. परंतु वर्षभरात महागाई 4.5% च्या आसपास राहील. सध्याची परिस्थिती, सध्याची चलनवाढीचा वेग आणि सध्याचा वाढीचा मार्ग लक्षात घेता, RBI ने सरासरी 4.5% महागाईचा अंदाज वर्तवला आहे.

आता रेपो दर किती आहे?

मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात, 72 पैकी 71 अर्थतज्ञांनी अशी आशा व्यक्त केली होती की एमपीसी 5 ते 7 जून दरम्यानच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करणार नाही आणि तो 6.50% वर ठेवेल. याव्यतिरिक्त, यापैकी बहुतेक अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की 6.50% दर हा सध्याच्या कालावधीतील रेपो दराचा सर्वोच्च दर आहे.

मध्यवर्ती बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दर 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला आणि तेव्हापासून सलग सात वेळा तो तसाच ठेवला. MPC मध्ये तीन बाह्य सदस्य आणि तीन RBI अधिकारी समाविष्ट आहेत. शशांक भिडे, आशिमा गोयल आणि जयंत आर वर्मा हे दर निश्चिती समितीचे बाह्य सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT