Global recession  sakal
Personal Finance

European Recession: युरोपात मंदीची लाट? जर्मनी, स्पेन, ग्रीसनंतर नेदरलँडची अर्थव्यवस्था कोलमडली

युरोपातील अनेक देशांची आर्थिक गाडी रुळावरुन घसरत असल्याचं चित्र आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लंडन : युरोपाची आर्थिक स्थिती सध्या बिकट बनली आहे. कारण जर्मनी, स्पेन, ग्रीस या प्रमुख देशांनंतर आता नेदरलँड या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कारण या वर्षी सलग दुसऱ्या तिमाहीत या देशाच्या जीडिपीत - ०.३ टक्के अकुंचन पावल्यानं नेदरलँडला अधिकृतरित्या तात्रिक मंदीत ढकललं आहे. अनेक देशांमध्ये सुरु असलेल्या या ट्रेन्डमुळं युरोपात सध्या आर्थिक मंदीची लाट सुरु झाल्याची स्थिती आहे. (European Recession wave of economic recession after Germany Spain Greece Netherlands GDP collapsed)

नेदरलँड ढकलला गेला 'तांत्रिक मंदीत'

नेदरलँडमध्ये सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत घसरण झाल्यानं हा देश अधिकृतरित्या 'टेक्निकल रिसेशन'मध्ये गेला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात झालेली घट आणि घरगुती वस्तूंचा कमी झालेला वापर ही या आर्थिक मंदीची प्राथमिक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. 'द तत्व इंडिया' या वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

मंदीची ही आहेत कारण?

या वर्षातील सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या तुलनेत नेदरलँडची अर्थव्यवस्था - ०.४ टक्क्यांनी आकुंचली होती. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत ती आर्थिक मंदीपर्यंत पोहोचली. त्यानंतर २०२२ च्या तुलनेत या देशाचा जीडीपी सध्या - ०. ३ इतका आकुंचन पावला आहे. मालाची निर्यात कमी झाल्यानं, घरगुती खर्चात कपात झाल्यानं तसेच आयातीत वाढ झाल्यानं हा परिणाम दिसून येत आहे. (Latest Marathi News)

जीडीपीतील व्यापाऱ्याचा वाटा घसरला

या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत निर्यातीत - ०. ७ टक्के घट झाली. त्याचा हळूवारपणे आयातीवरही परिणाम झाला, आयातही -१.४ टक्क्यांनी घटली. तर दुसरीकडं सेवांच्या निर्यातीत २.५ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. याचा एकत्रितपणे आश्चर्यचकीत करणारा परिणाम म्हणजे जीडीपीतील निव्वळ व्यापाराचा वाटा खूपच वाईट स्थितीत पोहोचला. तर आयातीत ०.५ टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये वस्तूमाल (०.४ टक्के) तर सेवा (०.१ टक्के) अशी वाढ झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

कृषी-मत्स क्षेत्राला सर्वाधिक फटका

एकूणच नेदरलँडच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि मत्स या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. हे क्षेत्र -४.१ टक्क्यांपर्यंत आकुंचन पावलं आहे. तर व्यापार, ट्रान्सपोर्ट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात -२.० टक्के आकुंचलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT