Budget 2024 esakal
Personal Finance

Budget 2024: आर्थिक पाहणी अहवाल आज मांडणार;अर्थमंत्री सीतारामन सादर करणार वर्षाचा लेखाजोखा

संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी एक दिवस आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्याची परंपरा आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी एक दिवस आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्याची परंपरा आहे.

अर्थव्यवस्थेबाबतची सांख्यिकीय माहिती, विविध क्षेत्रांचे विश्लेषण, रोजगाराची आकडेवारी, जीडीपी दर, महागाई आणि वित्तीय तूट याबाबतची समग्र माहिती आर्थिक पाहणी अहवालाद्वारे दिली जाते. मागील आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेने केलेली कामगिरी या अहवालात मांडली जाते. तसेच आगामी काळातील अंदाजही व्यक्त केले जातो. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल तयार केला आहे.

जगातील वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा जीडीपी दर सात टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला होता. विशेष म्हणजे गेल्या जून महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने देशाच्या जीडीपी दराची सुधारित आकडे जारी करताना सात टक्क्यांऐवजी ७.२ टक्के इतका विकास दर राहील, असे सांगितले होते.

आर्थिक सुधारणांना देण्यात आलेल्या गतीमुळे विकास दर आठ टक्क्यांवर जाणे कठीण नसल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. आर्थिक पाहणी अहवाल दोन भागात तयार केला जातो. पहिल्या भागात अर्थव्यवस्थेच्या एकूण स्थितीचा ऊहापोह असतो तर दुसऱ्या भागात भविष्यातील दिशा मांडण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : १८ चेंडूंत ७२ धावा… पृथ्वीचे वादळी शतक, Ranji Trophy स्पर्धेच्या इतिहासातील सहावी वेगवान Century

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध? शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल, होणारा नवरा काय करतो?

UPI Mapper ने घातलाय धुमाकूळ! UPI अ‍ॅप्सच्या हुशारीमुळे युजर्स गोंधळात; NPCI ने घेतला मोठा निर्णय, ऑनलाइन पेमेंट करत असाल तर हे एकदा बघाच

Kolhapur Politics : 'आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरला 50 वर्षे मागे नेले'; खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT