असं मिळवा शैक्षणिक कर्ज Esakal
Personal Finance

Education Loan घेताना गोंधळ उडतोय? मग ‘हा’ आहे शैक्षणिक कर्ज घेण्याचा सोपा उपाय

शैक्षणिक कर्ज घेत असताना बँक Bank कशी निवडावी? कोणते निकष ध्यानात घ्यावे आणि कसा अर्ज करावा यासोबत इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला एज्युकेशन लोन घेणं सोप होईल

Kirti Wadkar

भारतासारख्या देशामध्ये आजही उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो. अशावेळी अनेकांना Education Loan म्हणजेच शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करावं लागतं. मुलांना उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांचं भविष्य उज्ज्वल करता यावं यासाठी अनेक सरकारी तसचं खासगी बँकांकडून हे एज्युकेशन लोन दिलं जातं. Finance Tips Marathi Know how to get education loan easily

असं असलं तर अनेकदा विद्यार्थांना Students तसंच पालकांनादेखील नेमकं कोणच्या बँकेतून शैक्षणिक कर्ज Education Loan घ्यावं, या कर्जासाठी कसा अर्ज करावा, अशा प्रश्नांसोबत इतर अनेक प्रश्न पडत असतात आणि त्यामुळे त्यांचा पुरता गोंधळ उडतो.

शैक्षणिक कर्ज घेत असताना बँक Bank कशी निवडावी? कोणते निकष ध्यानात घ्यावे आणि कसा अर्ज करावा यासोबत इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला एज्युकेशन लोन घेणं सोप होईल.

योग्य रिसर्च करा- एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी विविध बँका किंवा लेंडर्स आणि त्यांच्याकडून पुरवण्यात येणाऱ्या एज्युकेशन लोनची संपूर्ण माहिती करून घ्या. जेणेकूरन तुम्हाला तुलना करणं सोप होईल.

यात व्याजदरासोबतच इतर चार्जेस जसं की प्रोसेसिंग फी, फोरक्लोजर चार्जेस अशा विविध शुल्कांची माहिती करून घ्या. त्याचसोबत काही हिडन चार्जेस असतील तर त्याची माहिती करून तुलना करा.

पात्रता तपासा- बँका किंवा इतर फायनान्स कंपन्यांकडून ठरवण्यात आलेले पात्रता निकष समजून घ्या. कर्जदाराचं वय, शैक्षणिक पात्रता, लोन प्लॅन अंतर्गत येणारे कोर्सेस आणि महाविद्यालयं यांच्या पात्रतेत तुम्ही बसत आहात का, हे तपासून घ्या.

कर्जाची रक्कम- एज्युकेशन लोन किंवा शैक्षणिक कर्ज घेत असताना शिक्षणाच्या खर्चासाठी लागणार असेल तितकंच कर्ज घ्या. जास्त कर्ज घेणं टाळा. यासाठी महाविद्यालयाची फी, हॉस्टेल किंवा राहण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च यांची गोळाबेरीज करून एक अंदाज लावा आणि कर्जासाठी अर्ज करा.

व्याजदर आणि रिपेमेंटच्या अटी

कोणतही कर्ज घेत असताना अर्थातच सर्वप्रथम व्याजदर पाहिला जातो. त्याचप्रमाणे एज्युकेशन लोन घेत असतानाही व्याजदाराची तुलना करा. तसचं फिक्स्ड आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट यांची तुलना करून योग्य पर्याय निवडा.

तसंच रिपेमेंटच्या अटी आणि शर्ती आणि ग्रेस पिरीयेडबद्दल माहिती जाणून घ्या. त्यानंतरच योग्य प्लान निवडा.

क्रेडिट स्कोर

कर्ज घेतल्यानंतर जर तुम्ही कर्जाची रक्कम किंवा रिपेमेंट वेळोवेळी केलंत तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहण्यास मदत होईल. जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला व्याजदर कमी करण्यासाठी संबधित बँकेशी चर्चा करता येते.

लोन प्रोसेसिंग टाइम

शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी बँका किंवा फायनान्स कंपन्यांचा लोन प्रोसेसिंग टाइम तपासून पहा. यामुळे तुम्हाला कागदपत्रांची जमवाजमव करण्यास पुरेसा वेळ मिळेल. तसंच त्यानुसार तुम्हाला कर्जासाठी कधी अर्ज करावा याचा अंदाज बांधणं सोप होईल.

अंतिम करार तपासा

एज्युकेशन लोन घेत असताना लोन अप्रूव्ह झाल्यानंतर बँकांकडे तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा नियम आणि अटी तपासून पहा. अंतिम करारावर सह्या करण्यापूर्वी बँकेच्या सर्व शर्ती समजूनच सह्य़ा करा.

या सर्व गोष्टींचा विचार केल्यास तुम्हाला एज्युकेशन लोन घेणं सोप होईल.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

Grahan 2026 in India: यंदा भारतात कोणकोणती ग्रहणे दिसतील? सुतक वेळ आणि १२ राशींवरील परिणाम जाणून घ्या एका क्लिकवर

LinkedIn: लिंक्डइनच्या धक्कादायक अहवालाने भारतभर खळबळ; ८४% प्रोफेशनल्स ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये, नोकरी शोधापासून दूर राहत करियरला ब्रेक

Organ Donate : छपन्न वर्षांच्या हृदयाची चिमुकलीत धडधडली स्पंदने; अवयवदानामुळे त्या मृत्यूनंतरही जिवंत राहिल्या

Latest Maharashtra News Updates Live: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT