FM Sitharaman says RBI to take a call on interest rates keeping growth in mind
FM Sitharaman says RBI to take a call on interest rates keeping growth in mind  Sakal
Personal Finance

RBI MPC: आरबीआय व्याजदर वाढवणार की कमी करणार...? अर्थमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

राहुल शेळके

RBI MPC Meeting: आर्थिक विकासातील आव्हाने लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व्याजदरांबाबत निर्णय घेईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. अंतरिम अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली आहे. 

व्याजदर स्थिर राहतील असे मला वाटते, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ते स्थिर राहतील अशी माझी अपेक्षा आणि आशा आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) धोरण बैठकीच्या काही दिवस आधी व्याजदरांबाबत अर्थमंत्र्यांनी भाष्य केले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएमच्या बँकिंग युनिट पेटीएम पेमेंट्स बँकेवर अनेक निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

या निर्णयामुळे या क्षेत्रातील इतर अनेक कंपन्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. विशेषत: फिनटेक स्टार्टअप्सना या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. या कंपन्यांनी या क्षेत्राबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. (Nirmala Sitharaman on Paytm)

अर्थमंत्र्यांनी या क्षेत्रातील तरुणांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि सांगितले की सरकार या क्षेत्रात काम करण्यासाठी खूप उत्साही आहे आणि अधिकाधिक नवीन कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. सीतारामन म्हणाल्या की, भारताच्या फिनटेक इनोव्हेशनला जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे आणि जगातील अनेक देश आर्थिक तंत्रज्ञान उपायांसाठी भारताकडे पाहत आहेत.

निर्मला सीतारामन निर्गुंतवणुकीवर काय म्हणाल्या?

निर्गुंतवणूक हाच संसाधने वाढवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रोजगाराची पद्धत बदलत आहे. फिक्स डिपॉझिटमधूनही बचत होत असून शेअर बाजाराच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांची बचत वाढताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT