Mamata Banerjee Sourav Ganguly esakal
Personal Finance

Sourav Ganguly: क्रिकट सोडून 'या' क्षेत्रात सौरव गांगुली करणार बॅटिंग, केली मोठी घोषणा

Sourav Ganguly Factory: सौरभ गांगुली राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या.

राहुल शेळके

Sourav Ganguly Factory: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता व्यावसाय क्षेत्रात उतरणार आहे. स्पेनमधील माद्रिद येथे गुरुवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्याने ही घोषणा केली.

सौरभ गांगुली पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर येथील सालबोनी येथे स्टील कारखाना सुरू करणार आहे. क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवल्यानंतर सौरभ गांगुली राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या.

दरम्यान, आता त्याने व्यवसाय क्षेत्रात उतरण्याची तयारी केली असून, पोलाद उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला आहे. सध्या गांगुली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत स्पेनमध्ये असून तिथूनच त्याने हा खुलासा केला आहे. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही माद्रिदहून त्यांच्या फेसबुक पेजवर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत स्पेन आणि दुबईच्या 12 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. या भेटीदरम्यान तो म्हणाला की, त्यांचा स्टील प्लँट पाच ते सहा महिन्यांत पूर्ण होईल.

सौरभ गांगुलीने आपल्या भाषणादरम्यान सांगितले की, त्याचे कुटुंब हे एक व्यावसायिक कुटुंब आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आजोबांनी 50-55 वर्षांपूर्वी बंगालमध्ये एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता, त्यावेळी त्यांना राज्य सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळाला होता. या राज्याने जगाला नेहमीच व्यापारासाठी आमंत्रित केले आहे. असे तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT