Ganeshotsav 2023 Sakal
Personal Finance

Ganeshotsav 2023: गणेशाकडून तुम्ही शिकू शकता हे ५ गुंतवणुकीचे धडे

Ganeshotsav 2023: गणपती हा सुख, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.

राहुल शेळके

Ganeshotsav 2023: गणेश उत्सव सुरु होण्यास आता फक्त चार दिवस राहिले आहेत. सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणतात आणि बाप्पाची पूजा करतात. यंदा गणेश चतुर्थी हा सण 19 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत साजरा केला जाणार आहे.

गणपती हा सुख, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. पण, त्यांच्याकडून अनेक गुंतवणुकीचे धडेही शिकता येतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गणपती बाप्पाकडून आपण शिकू शकतो.

गणपती बाप्पाचे डोके काय सांगते?

गणपतीचे मोठे डोके सांगते की, गुंतवणुकीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकीचा (long Term Investment) विचार केला पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणूक ही भविष्यासाठी फायद्याची आहे.

डोळे काय सांगतात?

गणपतीचे डोळे मोठे आणि तीक्ष्ण आहेत. आपण आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नये असे ते सांगतात. गुंतवणुकीत यश मिळवण्याचा हा मंत्र आहे. कधीकधी आपण लवकर नफा कमवण्यासाठी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो. त्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी आपण दीर्घकालीन फायद्याचा विचार केला पाहिजे

कान काय सांगतात?

गणपतीचे कान मोठे आहेत. या मोठ्या कानातून अनेक गोष्टी ऐकायला येतात. यातून शिकता येणारा धडा असा आहे की, आपण प्रत्येकवेळी गुंतवणूकीबाबत वेगवेगळी माहिती ऐकत असतो. गुंतवणूकीबाबत आपण नीट विचार केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सल्लागारांशी बोलताना किंवा कोणताही सल्ला ऐकताना कान उघडे ठेवले पाहिजेत.

गणपतीची कुऱ्हाड काय म्हणते?

गणपतीच्या हातात दिसणार्‍या कुऱ्हाडीला विशेष महत्त्व आहे. या कुऱ्हाडीने तो आपल्या भक्तांचे संकट आणि अडथळे दूर करतो. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ बाजारातील चढ-उतारांबद्दल चिंता करू नये. बाजारातील संधी आणि येणाऱ्या भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे.

पोट काय शिकवते?

गणपतीचे पोट खूप मोठे आहे. यालाही एक वेगळे महत्त्व आहे. गुंतवणूक करताना तग धरून बाजारातील प्रत्येक चढ-उतार शांतपणे पचवला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT