Gautam Adani Sakal
Personal Finance

Gautam Adani: "ही भारताची वेळ..." चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर गौतम अदानींचे ट्वीट चर्चेत

Gautam Adani: या ऐतिहासिक कामगिरीसाठी जगभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राहुल शेळके

Gautam Adani on Chandrayaan 3: चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या अद्भुत कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि दक्षिण आफ्रिकेतील देशवासियांचे अभिनंदन केले आहे.

त्याचवेळी, देशातील कॉर्पोरेट कंपन्यांनी आणि उद्याेजकांनी देखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन केले आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही इस्रो आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले आहे.

गौतम अदानी ट्विट करत म्हणाले की, ''अभिनंदन, 'इस्रो’! खरच तुम्ही देशाची शान आहात. अंतराळ मोहिमा राबविण्याची देशाची क्षमता हा देशाचा आत्मविश्वास दर्शवते आणि हीच भारताची वेळ आहे. 1.4 अब्ज नागरिकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. देशाच्या कक्षा विस्तारत आहेत. जय हिंद''

चांद्रयान 14 जुलै रोजी मोहिमेला सुरुवात

चांद्रयान-3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 14 जुलै रोजी पहाटे 3.35 वाजता प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी 41 दिवस लागले. पृथ्वीपासून चंद्राचे एकूण अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे.

या ऐतिहासिक कामगिरीसाठी जगभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव झाला. नासाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर बिल नेस्लन, ब्रिटिश स्पेस एजन्सी, युरोपीय स्पेस एजन्सी अशा सर्व संस्थांनी आणि कित्येक देशांनी इस्रोचं आणि देशाचं अभिनंदन केलं.

भारताच्या या यशाचं श्रेय नक्कीच पूर्णपणे इस्रोच्या वैज्ञानिकांचं आहे. या यशात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस.सोमनाथ यांच्यासह ‘चांद्रयान-3’ मोहिमेचे संचालक मोहन कुमार, रॉकेट संचालक बीजू सी. थॉमस यांचा मोठा वाटा आहे.

'इस्रो’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ‘चांद्रयान-3’ या मोहिमेत 54 महिला अभियंत्या आणि शास्त्रज्ञांचा सहभाग होता. ‘इस्रो’च्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या केंद्रातील विविध विभागांत त्या अधिकारीपदावर काम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT