Germany Overtakes Japan As World's Third Largest Economy, As Japan Slips Into Recession  Sakal
Personal Finance

Japan Economy: जपानमध्ये मंदीचा कहर; जर्मनी बनली जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारतासाठी मोठी संधी

Japan Economy: जपानची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत गेली आहे. सलग दोन तिमाहीत जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीने जपानकडून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. आता जर्मनी ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.

राहुल शेळके

Japan Economy: जपानची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत आहे. सलग दोन तिमाहीत जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीने जपानच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. जपानला मागे टाकात जर्मनी ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. जपानचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये वार्षिक 0.4% घसरले.

या घसरणीनंतर, सेंट्रल बँक ऑफ जपानचे गव्हर्नर काज़ुओ उएदा यांच्यासाठी व्याजदर कमी करण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. याशिवाय, आर्थिक धोरणाच्या मुद्द्याबाबत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. (Germany Overtakes Japan As World's Third Largest Economy, As Japan Slips Into Recession)

जपानने तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान गमावला?

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2023 साठी जपानचा नाममात्र GDP 4.2 ट्रिलियन डॉलर होता. येनच्या घसरणीमुळे हा मोठा बदल दिसून आला आहे. 2022 मध्ये, जपानचे चलन डॉलरच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी घसरले, तर गेल्या वर्षी ते 7 टक्क्यांनी घसरले.

भारत जपान-जर्मनीला टक्कर देईल

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF)अंदाज आहे की भारताची अर्थव्यवस्था 2026 मध्ये जपान आणि 2027 मध्ये जर्मनीला मागे टाकेल आणि जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत सामील होईल. सध्या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. (Germany overtakes Japan as land of rising sun enters recession)

फोर्ब्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिका सध्या 27.974 ट्रिलियन डॉलर्ससह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. चीन 18.566 ट्रिलियन डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर, जर्मनी 4.730 ट्रिलियन डॉलरसह तिसऱ्या आणि जपान 4.291 ट्रिलियन डॉलरसह चौथ्या स्थानावर आहे. तर भारत 4.112 ट्रिलियन डॉलर्ससह जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

भारत GDP मध्ये जपानची जागा घेईल

टोकियो विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक तेत्सुजी ओकाझाकी म्हणाले की, ताज्या आकडेवारीवरून जपानचे वास्तव दिसून येते. ते म्हणाले, बऱ्याच वर्षांपूर्वी, जपानच्या ऑटो सेक्टरमध्ये भरभराट झाली होती. मात्र इलेक्ट्रिक वाहनांमुळे जपानला याचा फटका बसला.

ओकाझाकी म्हणाले की, विकसित आणि विकसनशील देशांमधील दरी सातत्याने कमी होत आहे. येत्या काही वर्षांत भारत GDP मध्ये जपानची जागा घेईल. जपानमधील कामगार टंचाईची समस्या सोडवण्यासाठी इमिग्रेशन हा एकमेव पर्याय आहे. पण जपान परदेशी कामगार स्वीकारण्यास नकार देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: अजित पवार यांच्या कट्टर कार्यकर्त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

ZP Panchayat Samiti New Dates: ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या; आता 'या' तारखेला मतदान

BHU Student Violence : वाराणसीतील ‘BHU’मध्ये राडा! विद्यार्थ्यांचे दोन गट आपसांत भिडले; जोरदार दगडफेक, पोलिस तैनात

BBL सोडून Babar Azam मायदेशी परतला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच T20I मध्ये फ्लॉप झाला; मात्र पाकिस्तानला विजय मिळवण्यात यश

Latest Marathi News Live Update: कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या तरुणावर गुन्हा

SCROLL FOR NEXT