Gold and silver prices rose again; What is the reason behind this increase  Sakal
Personal Finance

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

MCX Gold Silver Rates Today: सोन्या-चांदीच्या भावाची चमक पुन्हा एकदा वाढली आहे. MCX वर सोने पुन्हा एकदा 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर गेले आहेत. चांदी पुन्हा एकदा 82,000 रुपये प्रति किलोच्या वर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

MCX Gold Silver Rates Today: सोन्या-चांदीच्या भावाची चमक पुन्हा एकदा वाढली आहे. MCX वर सोने पुन्हा एकदा 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर गेले आहे. चांदी पुन्हा एकदा 82,000 रुपये प्रति किलोच्या वर व्यवहार करत आहे.

आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने प्रति 10 ग्रॅम 390 रुपयांच्या वाढीसह 70,849 रुपयांवर ​​उघडले. शुक्रवारी सोन्याचा भाव 70,668 रुपयांवर बंद झाला होता. दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत सोन्याच्या भावात कमालीची वाढ झाली होती, मात्र गेल्या आठवड्यापासून त्यात घसरण दिसून येत आहे. गेल्या महिन्यात सोन्याने 73,958 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.

चांदीचा भावही 800 रुपयांपेक्षा अधिक वाढीसह 81,603 रुपये प्रति किलोवर उघडला. सध्या चांदीचा भाव 1160 रुपयांच्या वाढीसह 82,200 रुपयांच्या वर आहे. इंट्राडेमध्ये चांदी 82,284च्या पातळीवर पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने चमकत आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव सुमारे 2320 प्रति औंस डॉलर आहे. डॉलरमधील घसरण आणि अमेरिकेतील बेरोजगारीच्या ताज्या आकड्यांमुळे सोन्याचे भाव वाढत आहेत.

अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारीही अपेक्षेपेक्षा वाईट आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत 1.75 लाख नवीन नोकऱ्यांची भर पडली, तर अंदाज 2.5 लाख नोकऱ्यांचा होता. याशिवाय बेरोजगारीचा दरही 3.9% पर्यंत वाढला आहे, हा देखील अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे.

या दोन आकड्यांमुळे आता फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करेल अशी आशा बाजाराला आहे, त्याबाबत फेडचा दृष्टिकोन अजून स्पष्ट झालेला नाही. अमेरिकन डॉलर देखील गेल्या आठवड्यात 0.8% ने घसरला आहे, यामुळे सोन्याच्या भावाला आधार मिळाला आहे.

तज्ञांचे काय मत आहे?

केडिया ॲडव्हायझरीचे सीएमडी अजय केडिया यांच्या मते, मार्च तिमाहीत भारतात सोन्याच्या मागणीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण जागतिक सुवर्ण परिषदेच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये सोन्याचा वापर वाढलेल्या किमतींमुळे कमी होऊ शकतो.

हॉलमार्ककडे लक्ष द्या

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी सोने खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT