Gold Rates eSakal
Personal Finance

Gold Rate : दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव; चांदीही झाली स्वस्त.. काय आहे कारण?

Weekly Gold Rate : चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. 16 जून रोजी चांदीची किंमत 85,000 रुपये किलो एवढी होती, जी आता कमी होऊन 82,500 एवढी झाली आहे.

Sudesh

Gold Rate Updates : गेल्या काही दिवसांमध्ये भारतात सोन्याच्या किंमतीत प्रचंड तेजी दिसून येत होती. काही दिवसांपूर्वीच सोन्याचा भाव हा तब्बल 74,000 रुपये प्रतितोळा एवढा झाला होता. मात्र गेल्या दहा दिवसांमध्ये या किंमती पुन्हा झपाट्याने खाली आल्याचं दिसत आहे. वायदे बाजारात (MCX) सोनं सुमारे 2,500 रुपयांनी स्वस्त झाल्याचं दिसत आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत 71,486 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती. 5 जूनच्या वायद्यासाठी सोन्याची किंमत ही गेल्या दहा दिवसांमध्ये भरपूर कमी झाली आहे. 16 एप्रिल रोजी सोन्याची किंमत ही सुमारे 74,000 प्रतितोळा एवढी होती, जी आता कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमती सुमारे 4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

चांदीच्या किंमतीही घसरल्या

एमसीएक्सवर केवळ सोनंच नाही, तर चांदीच्या किंमतीमध्ये देखील मोठी घट झाल्याचं दिसत आहे. 16 जून रोजी चांदीची किंमत 85,000 रुपये किलो एवढी होती, जी आता कमी होऊन 82,500 एवढी झाली आहे. म्हणजेच, सोन्यासोबत चांदीच्या किंमतीमध्ये देखील सुमारे 2,500 रुपयांची घट झाली आहे.

कशामुळे कमी झाली किंमत?

गेल्या काही दिवसांमध्ये इस्राइल आणि इराणमध्ये युद्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे. यामुळे गुंतवणुकदार रिलॅक्स झाले असून, सोन्याची खरेदी देखील कमी झाली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांमध्ये या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सोनं हे सुमारे 70 हजार रुपये प्रतितोळा एवढं खाली घसरेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : गणपतीला कोकणात गेलेले परतीच्या मार्गावर, रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल,आधुनिक स्वयंचलित तराफ्याद्वारे होणार विसर्जन

SCROLL FOR NEXT