Gold Silver Price Today Latest Update 17 October 2023 Sakal
Personal Finance

Gold Rate Today: सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात घसरण, खरेदीची उत्तम संधी, काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today in India: देशातील सर्वच शहरांमध्ये सोन्याच्या भावात काहीशी घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update 17 October 2023:

देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या पुढे आहे. देशातील सर्वच शहरांमध्ये सोन्याच्या भावात काहीशी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात 100 ते 200 रुपयांची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,900 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,000 रुपयांवर आहे. चांदीचा भाव 73,600 रुपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • हैदराबाद - 59,950 रुपये

  • कोलकत्ता - 59,950 रुपये

  • गुरुग्राम - 60,100 रुपये

  • मुंबई - 59,950 रुपये

  • पुणे - 59,950 रुपये

  • पटना - 60,000 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026 : केन विलियम्सन, LSG चा नवा मुख्य प्रशिक्षक? रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली आलेल्या अपयशानंतर संजीव गोएंका मोठा निर्णय घेणार

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Mumbai News: जलसाठ्यावर चिंतेचे ढग! सात तलावांत उरले फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT