Gold-Silver price sakal
Personal Finance

Gold Silver Price: सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा दर

बुधवारी सोन्याने 61,000 ची विक्रमी पातळी गाठली. त्यानंतर आज सोन्याच्या दरात घट नोंदवली आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price: आज सकाळी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तत्पूर्वी, डॉलर निर्देशांकात मोठी घसरण झाल्याने सोन्याच्या भावाला आधार मिळाला. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने नवीन उच्चांक गाठला होता.

सोप्या भाषेत सांगायचे तर अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे सोने स्वस्त झाले आहे. देशांतर्गत फ्युचर्स मार्केट म्हणजेच MCX वर सोने 61000 रुपयांच्या खाली आले. त्याचप्रमाणे चांदीही स्वस्त झाली आहे. यापूर्वी चांदीच्या भावाने 32 महिन्यांची उंची गाठली होती, जी प्रति किलो 75175 रुपये होती.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,900 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,980,रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 764 रूपये आहे. (Gold Silver Price latest Updates 6 April 2023 Know today's rate in your city)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,640 रुपये

दिल्ली - 61,130 रुपये

हैदराबाद - 60,980 रुपये

लखनऊ - 61,130 रुपये

मुंबई - 60,980 रुपये

पुणे - 60,980 रुपये

नागपूर - 60,980 रुपये

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

SCROLL FOR NEXT