Gold-Silver Price Sakal
Personal Finance

Gold-Silver Price : खुशखबर! सोन्याच्या दारात 2,500 रुपयांची घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक महिन्यांच्या वाढीनंतर सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. या व्यावसायिक आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने प्रति 10 ग्रॅम 217 रुपयांनी स्वस्त झाले.

तर चांदीच्या दरात 10 रुपयांची किरकोळ वाढ झाली. यानंतर सोन्याचा भाव 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत 65,800 रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरली.

मंगळवारी, या व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, सोने (Gold Price Toaday) प्रति 10 ग्रॅम 217 रुपयांनी स्वस्त झाले आणि 56,384 रुपये प्रति किलोवर बंद झाले.

तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 426 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आणि 56,601 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - 57,550 रुपये

  • दिल्ली - 56,880 रुपये

  • हैदराबाद - 56,730 रुपये

  • कोलकत्ता - 56,730 रुपये

  • लखनऊ - 56,880 रुपये

  • मुंबई - 56,730 रुपये

  • पुणे -56,730 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT