Gold Silver Price Sakal
Personal Finance

Gold Silver Price Today: नागपंचमी निमित्त सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today: आज एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या भावात वाढ होत आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update On 21 August 2023: आज नागपंचमीला सोन्या-चांदीच्या भावात बदल होताना दिसत आहे. सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. आज एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीमध्येही तेजी दिसून येत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीन भाव एकदा नक्की पहा.

सराफा बाजारात सततच्या घसरणीनंतर सोमवारी पुन्हा एकदा चमक पाहायला मिळत आहे. देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. MCX वर सोन्याचा भाव 15 रुपयांच्या वाढीसह 58,390 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर व्यवहार करत आहे.

त्याचप्रमाणे चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. MCX वर, एक किलो चांदीचा भाव 200 रुपयांनी वाढून 70,400 रुपयांच्या पुढे गेला आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • दिल्ली - 59,220 रुपये

  • हैदराबाद - 59,070 रुपये

  • कोलकत्ता - 59,070 रुपये

  • लखनऊ - 59,220 रुपये

  • मुंबई - 59,070 रुपये

  • पुणे - 59,070 रुपये

  • नागपूर - 59,070 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

नवा नियम:

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने दिली धडक, पुण्यात सीएनजी पंपासमोरील घटना, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Jayant Patil : वाळवा तालुक्यात सत्तासंघर्ष तीव्र! जयंत पाटीलांची भिंगरी, महायुतीचा बालेकिल्ला ढवळून निघाला

Shaktipeeth Mahamarg alignment changed : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचा मार्ग बदलला, १२ ऐवजी १३ जिल्हांचा समावेश, राज्याच्या तिजोरीवर आणखी बोजा वाढणार

CM ममता बॅनर्जी बनल्या वकील, SIR प्रकरणी स्वत: मांडणार बाजू; सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडतंय

Study Tips: परीक्षेत लक्ष केंद्रित करण्यासाठी अभ्यासाचे टेबल कसे असावे? जाणून घ्या सोपे आणि महत्वाचे टिप्स

SCROLL FOR NEXT