Gold Silver Price Sakal
Personal Finance

Gold Silver Price: मोठी बातमी! सोन्याच्या भावात 450 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचा भाव

सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price: तुम्हालाही सोन्या-चांदींचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

आज, 18 मे रोजी सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 57,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,530 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव 78,200 रुपये प्रति किलो झाला आहे.

सराफा व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी सांगितले की, सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे.

चांदीच्या भावात आज 600 रुपयांनी घट झाली आहे. आज चांदी 78,200 रुपये प्रति किलो भावाने विकली जाईल. तर काल (बुधवार) सायंकाळपर्यंत 78,800 रुपये दराने चांदीची विक्री झाली आहे.

सोन्याचे भाव पडले:

मनीष शर्मा म्हणाले, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या दरात सुमारे 450 रुपयांची घसरण दिसून आली आहे. 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम काल संध्याकाळी 58,100 रुपयांवर होते. आज त्याची किंमत 57,650 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

म्हणजेच किंमतीत 450 रुपयांची घसरण दिसून आली आहे. बुधवारी 24 कॅरेट सोने 61,010 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. आज त्याची किंमत 60,530 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच किंमतीत 450 रुपयांची घसरण दिसून आली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

नवा नियम:

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT