Gold Silver Price sakal
Personal Finance

Gold Rate : होळी जवळ येताच सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

जर होळीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. आज मात्र सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. येत्या काही दिवसावर होळी आहे आणि तुम्ही जर होळीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,200 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 668 रूपये आहे. (Gold Silver Price update 2 march 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 57,110 रुपये

दिल्ली - 56,440 रुपये

हैदराबाद - 56,290 रुपये

कोलकत्ता - 56,290 रुपये

लखनऊ - 56,440 रुपये

मुंबई - 56,290 रुपये

पूणे - 56,290 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Internal Conflict : सुनेत्रा पवारांसमोर तटकरे-भुजबळांमध्ये वादावादी; पार्थ पवार तडकाफडकी निघून गेले, देवगिरी बंगल्यावरील वातावरण तापलं

Nashik: ३६ वर्षीय विवाहितेनं २६ वर्षीय प्रियकराचा केला खून, जिच्यासाठी घर सोडलं तिनेच संपवलं; तिघींवर गुन्हा दाखल

Nagpur: नवीन नागपूर, तिसऱ्या रिंगरोड प्रकल्पाला 'डबल बूस्ट', जमीन व्यवहार शुल्क माफ; एनएमआरडीएची ६०० कोटींची होणार बचत

Satara Accident: विहिरीतील खोल पाण्याने घेतला चिमुकल्याचा बळी; आई बचावली, मुलाचा मृत्यू, दहिवडीत हृदयद्रावक घटना

'तीन ब्राऊनी आणि पिझ्झा हे...' सारा अली खानने कसं घटवलं 45 किलो वजन, म्हणाली...

SCROLL FOR NEXT