Gold Silver rate today gold price fall karwachauth 2023 Latest Update 31 October 2023  Sakal
Personal Finance

Gold Rate Today: खुशखबर! करवा चौथच्या एक दिवस आधी सोने झाले स्वस्त; काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today in India: करवा चौथच्या एक दिवस आधी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update 31 October 2023:

करवा चौथच्या एक दिवस आधी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. उद्या बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी करवा चौथ आहे. जर तुम्ही करवा चौथसाठी तुमच्या पत्नीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच खरेदी करा. देशातील बहुतांश शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,500 ते 57,400 रुपयांच्या दरम्यान आहे. ज्वेलर्स 22 कॅरेट सोन्याचे दागिने बनवतात.

करवा चौथच्या एक दिवस आधी सोने झाले स्वस्त

करवा चौथच्या एक दिवस आधी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 500 रुपयांनी कमी झाला आहे. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढू लागली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याचा भाव 62,000 रुपयांच्या आसपास आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई- 62,350 रुपये

  • कोलकत्ता - 61,850 रुपये

  • दिल्ली - 62,430 रुपये

  • मुंबई - 61,850 रुपये

  • पुणे - 61,850 रुपये

  • पटना - 61,900 रुपये

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT